हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – ३०० ग्रॅम खिचडीतील १०० ग्रॅम मिळायची, लाईफ लाईनला टेंडर कंपनी स्थापन व्हायच्या आधीच मिळालं.त्यामुळे जेलमध्ये येणाऱ्या काळात कोणाला जावं लागेल ते कळेल, अशी टीका खासदार श्रीकांत शिंदे यांनी आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर केलीय. तुम्ही आमचे नेते असताना आपली सेवा करताना आपल्यासाठी आम्ही काय काय केलं. आमच्यासाठी ‘माझा महाराष्ट्र, माझी जबाबदारी’ हे उद्दिष्ठ आहे. पण, आपण मातोश्री १ मधून मातोश्री २ मध्ये कसे गेलात.तुमचा इनकम सोर्स काय असा सवाल त्यांनी केला. तुम्ही कोणावर बोलताय याचं भान ठेवा. आम्ही सत्तेत आल्यापासून काम करतोय. आम्ही अनेक योजना आणल्या.
तुम्ही काय केलं. आमचा साधा नगरसेवक घरी बसून काम करू शकत नाही. डोंबिवलीत तुमचं आजोळ आहे. त्यांनी त्या ठिकाणी येऊन लढावं. मग बघु किसमे हे कितना दम असे आव्हान श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना दिले.
=== विशाखा सातपुते ( ठाणे प्रतिनिधी )