हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने सोन्याचे अंडे देणारी कोंबडी असलेल्या मावळातील लाचखोरी आता वाढतच चालली आहे. गेल्या २४ तासांत लाचखोरीचा दुसरा गुन्हा शुक्रवारी दाखल झाला.गुन्ह्यातील दोन आरोपींच्या दोषमुक्तीचा अहवाल (ए फायनल) पाठविण्यासाठी त्यांच्याकडे एक लाख चाळीस हजार रुपयांची लाच मागणारा लोणावळा (ता. मावळ) ग्रामीण पोलिस ठाण्यातील एपीआय देविदास हिरामण करंडे याला एसीबीने आज जोरदार दणका दिला.
आजच्या लाचखोरीच्या घटनेत एपीआय करंडेने त्याच्याकडे तपास असलेला गुन्हा अ फायनल करण्यासाठी (म्हणजे त्यातील आऱोपींच्या दोषमुक्तीचा अहवाल न्यायालयाला पाठविण्याकरिता) त्यातील आरोपी महिलेकडे पन्नास हजार लाच मागितली.त्याबाबत तिने एसीबीत तक्रार केली. त्य़ाच्या पडताळणीत करंडेने त्याच गुन्ह्यातील दुसऱ्या आरोपीकडेही एक लाख रुपये लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याच्याविरुद्ध लोणावळा शहर पोलिस ठाण्यात लाच मागितल्याबद्दल एसीबीने गुन्हा नोंद केला.
=== गणेश मारुती जोशी ( स्थानिक प्रतिनिधी )