हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – दुकानदाराकडे हप्ता मागून शिवीगाळ करणाऱ्या आरोपींना समजावून सांगणाऱ्या मध्यस्थीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच वाहनांची तोडफोड केल्याची घटना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. ही घटना 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आंबेगाव खुर्द येथे घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक करुन तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. आकाश गुलाबराव कांबळे (वय-21 रा. शनिनगर, जांभुळवाडी रोड, आंबेगाव खुर्द), प्रविण रामा गुडे (वय-23 रा. अंजलीनगर, कात्रज), अभिषेक देवराव भगुरे (वय-18 रा. अंजलीनगर, लेन नंबर 3, कात्रज) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. तर त्यांच्या तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.आंबेगाव खुर्द येथील गणेश सुपर मार्केटचे मालक ताराराम देवाशी यांना आरोपी भुषण भांडवलकर व जावेद शेख यांनी विनोद सोमवंशी याच्या सांगण्यावरून मारहाण करण्याची जिवे व मारण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली. देवाशी यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपींनी ताराराम यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी फिर्य़ादी हे मध्यस्थी करण्यासाठी आले. त्यावेळी आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी व ताराराम यांना शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी यांच्या मुलावर विनोद सोमवंशी याने डोक्यात वार करुन जखमी केले. तसेच फिर्यादी यांचा पुतण्या वेदांत भंडारी व मुलाचा मेव्हणा प्रविण अंकुश यांना मारहाण केली. आरोपींनी फिर्यादी राहात असलेल्या घराच्या दरवाजावर व खिडक्यांवर लाथा व दगड मारुन नुकसान केले. तसेच पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करुन परिसरात दहशत निर्माण केली. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस अंमलदार अभिजीत जाधव, विक्रम सावंत, हर्षल शिंदे यांना गुन्ह्यातील आरोपी कात्रज तलाव येथे थांबले असून ते पळुन जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने आरोपींचा शोध घेऊन कात्रज तलाव परिसरातून 6 ऑक्टोबर रोजी तीन आरोपींना अटक केली. तर त्यांच्या तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार ,सह पोलीस आयुक्त संदीप कर्णीक ,अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील ,पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील ,सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड ,पोलीस निरीक्षक गुन्हे विजय पुराणिक , गिरीश दिघावकर,सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता ,मोहन कळमकर, पोलीस अंमलदार विक्रम सावंत, अभिजीत जाधव, हर्षल शिंदे, सचिन सरपाले,शैलेश साठे, चेतन गोरे, महेश बारावकर, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, अवधुत जमदाडे,निलेश खैरमोडे, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, राहुल तांबे यांच्या पथकाने केली.