हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी पक्षात शरद पवारांचा एक आणि अजित पवारांचा दुसरा गट तयार झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान सध्या या दोन गटापैकी राष्ट्रवादी पक्षाते नाव कोणाचा आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह कोणाला मिळणार यावरून दोन गटात केंद्रीय निवडणूक आयोगासमोत सुनावणी सुरू आहे.यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बालेकिल्ला पिंपरी चिंचवडमधून आणखी एक घडामोड समोर आली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरात अजित पवार यांचा प्रभाव मोठा आहे. नुकतेच अजित पवारांना पुण्याचे पालकमंत्रीपद देखील देण्यात आले आहे. यादरम्यान आज पिंपरी चिंचवड शहराचे माजी महापौर आझम पानसरेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची पुण्यात भेट घेतली आहे. यावरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
आझम पानसरे यांचा मुलगा निहाल पानसरे हा अजित पवारांच्या पाठीशी उभा होता. पण आज वडील आझम पानसरे यांनी शरद पवारांची भेट घेतली, त्यामुळं आझम पानसरे लवकरच शरद पवारांना पाठिंबा दर्शवतील असा दावा केला जात आहे.या भेटीवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष तुषार कामठे हे देखील त्यांच्यासोबत होते. दरम्यान आझम पानसरेंनी जर शरद पवारांना पाठिंबा जाहीर केला तर हा अजित पवारांसाठी मोठा धक्का असेल असे मानले जात आहे.
=== गणेश मारुती जोशी ( स्थानिक प्रतिनिधी )