हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मुंबई – बंगळुरू महामार्गावर एका टँकरला भीषण आग आज रात्री लागली आहे. ताथवडे येथे 11:30 च्या सुमारास ही घटना घडलेली आहे. टँकरमध्ये नेमके काय आहे अद्याप समजू शकलेलं नाही.मात्र एकामागोमाग होणाऱ्या स्फोटांमुळे ताथवडे महामार्ग परीसरात दहशत पसरलेली आहे. ताथवडे परिसरातील जेएसपीएम महाविद्यालया जवळ ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत चार-पाच महाविद्यालयाच्या बसेस देखील पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत.अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचलेले आहेत. टँकरला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे विभाग शर्तीचे प्रयत्न करीत आहे. आगीचे कारण अद्याप समजलेले नसून सुदैवाने कोणतीही जीवितहानीबाबत माहिती समोर आलेली नाही.
ताथवडे येथील जीएसपीएम कॉलेजच्या बाजूला असलेल्या मोकळ्या भूखंडामध्ये एक गॅस टँकर आहे. तीन ते चार स्फोट झाले आहेत. मोठी आग लागली आहे. घर इमारती हादरले आहेत जेएसपीएम कॉलेजचे अनेक विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहेत. हे सध्या वेगवेगळ्या हॉस्टेलमध्ये राहतात. घटनास्थळाच्या बाजूला अक्षर एलिमेंट या नावाची सोसायटी आहे. ती पूर्ण सोसायटी हादरली असून स्फोटामुळे नागरिक घाबरलेले आहेत रस्त्यावर मोठी गर्दी झाली आहे अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली आहे.
=== विनोद वाघमारे स्थानिक ( P. M. C प्रतिनिधी )