हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – जेएसपीएम कॉलेजच्या बाजूला तीन ते चार स्फोट झाले असून मोठी आग लागली आहे. या स्फोटानंतर परिसर हादरला आहे. त्यामुळे विद्यार्थी रस्त्यावर आले आहेत. सुदैवाने जीवितहानी झाल्याचे समोर आलेले नाही.पिंपरी चिंचवडमधील ताथवडे येथे जेएसपीएम कॉलेजच्या बाजूला तीन ते चार स्फोट झाले असून मोठी आग लागली आहे. या स्फोटानंतर परिसर हादरला आहे. त्यामुळे विद्यार्थी रस्त्यावर आले आहेत. ताथवडे येथील जेएसपीएम कॉलेजच्या बाजूला असलेल्या मोकळ्या भूखंडामध्ये एक गॅस टँकर आहे. त्याठिकाणी तीन ते चार स्फोट झाले आहेत. स्फोटानंतर घर इमारती हादरल्या आहेत. घटनास्थळाच्या बाजूला अक्षर एलिमेंट या नावाची सोसायटी आहे ती पूर्ण सोसायटी हादरली असून स्फोटामुळे नागरिक घाबरलेले आहेत.
रस्त्यावर मोठी गर्दी गोळा झाली असून अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली आहे. दरम्यान, मोठया गॅस टँकर आणि व्यावसायिक वापराच्या सिलिंडरमधून गॅस चोरीचा प्रयत्न होत असताना ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळावरून टँकर चालक पसार झाला आहे.
=== प्रदीप कांबळे ( स्थानिक वार्ताहार )