हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – मोटारीवर आदळून दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना माॅडेल काॅलनी भागातील दीपबंगला चौकात घडली. अर्पण महेश महाजन (वय २०, रा. अनंत अपार्टमेंट, माॅडेल काॅलनी, दीपबंगला चौक ) असे मृत्यमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस नाईक बाबा दांगडे व इरफान मुबीन हे चतुर्शिंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गस्तीवर असताना त्यांच्या समोर हा अपघात घडला वेळेचे विलंबन न करता अपघात घडलेल्या व्यक्तीला त्वरित जवळील हॉस्पिटल ला घेऊन गेले पण या दोन्ही पोलीस शिपायांच्या शर्तीच्या प्रयत्नांना यश आला नाही. याबाबत पोलीस नाईक बाबा दांगडे यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार अर्पण हा रविवारी (८ ऑक्टोबर) मध्यरात्री दीडच्या सुमारास दीपबंगला चौकातून भरधाव वेगाने निघाला होता. दुचाकीस्वार अर्पणचे नियंत्रण सुटले. तेथून निघालेल्या मोटारीवर दुचाकीस्वार अर्पण आदळला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या अर्पणचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. पोलीस उपनिरीक्षक चौगुले तपास करत आहेत.
=== गणेश मारुती जोशी ( स्थानिक प्रतिनिधी )