हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने थकबाकीदारांवर कारवाई सुरू केली आहे. ६८ जणांच्या मालमत्ता जप्त केल्या. त्यामुळे आता मालमत्ताधारकांचे धाबे दणाणले आहेत.मालमत्ता जप्त होऊ नये, यासाठी त्वरित कराचा भरणा करावा, असे आवाहन कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने केले आहे.पिंपरी-चिंचवड शहरात निवासी, औद्योगिक, बिगरनिवासी, मिश्र, मोकळ्या जमीन अशा ६ लाख ७ हजार मालमत्ता आहेत. या मालमत्ताधारकांकडून महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभाग कर वसूल करत आहे. पहिल्या सहामाहीत ५८५ कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात आला आहे. कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांना १ ऑक्टोबरपासून दोन टक्के विलंब शुल्क लागू झाले आहे. आता थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यासाठी तीव्र मोहीम सुरू आहे.आत्तापर्यंत कर संकलन विभागाने ४१ हजार ३०७ जणांना जप्ती नोटिसा तर ३६ हजार ७१९ मालमत्ताधारकांना जप्ती पत्रे धाडली आहेत. या मालमत्ताधारकांकडे तब्बल ६७१ कोटी रुपयांचा कर थकीत आहे. नोटिसा देऊनही कर न भरणाऱ्या सुरुवातीला बिगरनिवासी व मोकळी जप्त करण्यास सुरुवात केली आहे.
जप्ती मोहीम सुरू महापालिकेतर्फे ३ ऑक्टोबरपासून जप्ती माेहीम सुरू करण्यात आली असून, दोन हजार १८४ मालमत्ताधारकांना जप्ती अधिपत्र दिली आहेत. यापैकी १ हजार ९४८ मालमत्ता जप्ती अंमलबजावणीसाठी पात्र आहेत. यामध्ये ६८ मालमत्तांची जप्ती करण्यात आली. जप्ती करताच ६२ जणांनी तत्काळ ८७ लाख ३७ हजार रुपये रोख अथवा धनादेश जमा केले, तर सहा मालमत्ता या सील करण्यात आल्या आहेत.
जप्ती मोहिमेसाठी विविध उपक्रम राबविणार
१) यू-ट्यूबवर टार्गेट ऑडियन्स पाहून त्या त्या विभागामध्ये जाहिरात प्रसिद्ध करणार
२) रिक्षावरती जिंगलद्वारे प्रबोधन करणार असून, रिक्षावरती छोटे पोस्टर जे ठळक अक्षरामध्ये असतील की जप्तीची मोहिमेची माहिती देणार.
कर संकलन विभागाचे आता व्हाॅट्सॲप चॅनलमहापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या विविध सवलत योजना, माहिती यासह जनजागृती, थकबाकीदारांची माहितीही या व्हाॅट्सॲप चॅनलवरून प्रसारित करण्यात येणार आहे. जास्तीत-जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे.- नीलेश देशमुख (सहाय्यक आयुक्त)
=== विनोद वाघमारे ( स्थानिक प्रतिनिधी )