हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – गुन्हे शाखा युनिट ०४ कडील पोलीस उप निरीक्षक पाटील व स्टाफ असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गणेश माने यांचे मार्गदर्शन व सुचने प्रमाणे खडकी पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना, रेंजहिल्स ते खडकी पोलीस ठाणेकडे जाणा-या रोडने जात असताना रेल्वेच्या छोट्या बोगद्या जवळील म्हसोबा मंदीराजवळ चार आरोपींना युनिट-४ कडील पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. आरोपी नामे १) मुकेश ग्यानसिंग भुरीया, २) सुनिल कमलसिंग अलावा, ३) हरसिंग वालसिंग ओसनिया, ४) सुंदरसिंग भयानसिंग भुरीया सर्व आरोपी ता. कुक्षी, जि. धार, राज्य- मध्यप्रदेश येथील आहेत.आरोपींच्या ताब्यामध्ये रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने व घरफोडी करण्याची लोखंडी कटावणी, स्क्रुड्रायव्हर, लोखंडी पोपट पाना, लोखंडी कटर, गोफन अशी हत्यारे असा एकुण किंमत रु.८,८४,८३०/- चा – मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याकडे तपास करता, त्यांनी एप्रिल, मे, सप्टेंबर व ऑक्टोंबर महीन्या मध्ये पुण्यात येवून येरवडा, धानोरी, खडकी, विश्रांतवाडी, कोंढवा या परिसरात घरफोडी चो-या केल्या असल्याचे सांगितले.सदर आरोपीतां कडुन १) खडकी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ३५० / २०२३ भा.द.वि. कलम ४५७, ३८०, २) खडकी पोलीस ठाणे येथेगु.र.नं. ३७४ / २०२३ भा.द.वि. कलम ३९२, ३४, ३) खडकी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ३७५/२०२३ भा.द.वि. कलम ४५७, ३८०, ४) विश्रांतवाडी पोलीस ठाणे गु.र.नं. २६७ / २०२३ भा.द.वि. कलम ४५७, ३८०, ५) येरवडा पोलीस ठाणे गु.र.नं. ३५३ / २०२३ भा.द.वि. कलम ४५७, ३८०, ३४, ६) विमानतळ पोलीस ठाणे गु.र.नं. १८२/२०२३ भा.द.वि. कलम ४५७, ३८०, ३४, ७) कोंढवा पोलीस ठाणे गु.र.नं. १०३५/२०२३ भा.द.वि. कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. सदर आरोपी व जप्त मुद्देमाल हा पुढील कारवाई कामी खडकी पोलीस ठाणेच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.सदर आरोपी घरफोडी चोरी करण्यासाठी लागणारी हत्यारे, घातक शस्त्रे व दगड भिरकावुन मारण्यासाठी गोफन यासह काही कालावधीसाठी पुण्यामध्ये येतात. सदर आरोपी पुण्या मध्ये नदी-नाले, दाट झाडी अशा ठिकाणी दिवसाचे वेळी वास्तव्य करतात. नमुद आरोपी मध्यरात्रीचे वेळेस घरफोडी चोरी करण्यासाठी बाहेर पडतात. आरोपी नदी-नाल्यांचे कडेने फिरत-फिरत जातात व शेजारी असलेल्या अपार्टमेंट किंवा बंगलो सोसायटी मध्ये प्रवेश करुन बंद फ्लॅट, बंगलो फोडुन घरफोडी चोरी करतात. आरोपी चोरी करण्यासाठी एखाद्या ठिकाणी शिरल्यानंतर त्यांना कोणी प्रतिकार केल्यास ते त्यांचे कडील घातक शस्त्रे यांचा वापर करतात किंवा गोफणचा वापर करुन दगडे मारुन पळुन जातात. सदर आरोपीतांनी यापुर्वी भाऊ पाटील रोड, बोपोडी खडकी परिसरातील विविध अपार्टमेंटमध्ये अशाच प्रकारे घरफोडी चो-या केल्या होत्या. सदर परिसरामध्ये नागरीकां मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मा. वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी दिलेल्या आदेशा प्रमाणे सदर आरोपीतांचा गुन्हे शाखा युनिट ४ चे पथकाने शिताफिने पकडलेले आहे.
सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री रितेशकुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे – २ श्री. सतिश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गणेश माने यांचे मार्गदर्शनात युनिट ४ कडील सहा. पोलीस निरीक्षक श्री. विकास जाधव, पोलीस उप-निरीक्षक श्री. जयदीप पाटील, महेंद्र पवार व पोलीस अंमलदार अजय गायकवाड, हरिष मोरे, प्रविण भालचिम, सारस साळवी, विठ्ठल वाव्हळ, संजय आढारी, विनोद महाजन, स्वप्निल कांबळे, वैभव रणपीसे, अशोक शेलार, रमेश राठोड, वैशाली माकडी, मनोज सांगळे, शितल शिंदे यांनी केली आहे.
=== गणेश मारुती जोशी ( स्थानिक प्रतिनिधी )