हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी ग्रामस्थांच्या उपस्थित सर्वपक्षीय बैठक पार पडली.यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक विष्णूकाका हिंगे पाटील, शिवसेना शिंदे गटाच्या वतीने कल्याणराव हिंगे पाटील, अजित चव्हाण, भाजप आंबेगाव तालुका उपाध्यक्ष सुमित हिंगे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना तालुका प्रमुख सुरज हिंगे यांनी पुढाकार घेतला.विठ्ठल रुक्मिणी मंदिरात झालेल्या या बैठकीत शिवसेना शिंदे गटाचे कल्याणराव हिंगे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला पाच वर्षे सरपंचपद आणि उपसरपंच शिवसेना शिंदे गटाला देण्याचा प्रस्ताव मांडला, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पाच ग्रामपंचायत सदस्य व शिवसेना शिंदे गट, भाजप व इतर पक्षांना आठ जागा मिळाव्यात, अशी मागणी अजित चव्हाण यांनी बैठकीत मांडली.
या विषयावर विष्णुकाका हिंगे पाटील यांनी प्रथम इच्छुक कार्यकर्त्यांनी अर्ज भरू द्यावा, त्यानंतर एक ते पाच वॉर्डातील कार्यकर्त्यांनी बिनविरोध उमेदवारांची नावे जाहीर करावी किंवा एकापेक्षा जास्त इच्छुक असलेल्या ठिकाणी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन समजूत काढून वॉर्ड बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. गावात आनंदी वातावरण आणि एकोपा कायम राहण्यासाठी आपले प्रयत्न असल्याचे विष्णूकाका हिंगे पाटील यांनी यावेळी सांगितले.
=== गणेश मारुती जोशी ( स्थानिक प्रतिनिधी )