हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर ताई अशी काल टीका केली होती. मात्र, चित्रा वाघ यांनी अवघ्या काहीं तासानंतर त्यांना मोठ्या ताई म्हटलंय.राज्याच्या मोठ्या ताई चांगल्या आहेत. पण, योजनेला विरोध करणं हे तुमचं कर्तव्य झालं आहे का? असे चित्रा वाघ म्हणाल्यात. राज्यातल्या आमच्या भगिनी एकरी शंभर कोटी वांगी पिकवू शकत नाहीत.त्यामुळे महाराष्ट्रात जन्म घेणारी मुलगी ही लखपती होणार असेल तर तुमच्या पोटात का दुखतंय? असा टोला वाघ यांनी सुप्रिया सुळे यांना लगावलाय. कोणी लखपती होत असेल तर तुमच्या करोडपती होण्यावर कोणी आघात करत नाही. महिलांना मानसन्मान द्यायचा तर इतर पक्षांपेक्षा भाजपमध्ये महिलांना जास्त मानसन्मान मिळतो.