हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी माजी पालकमंत्री अजितदादा यांच्यावर मोठा आरोप केला.मीरा बोरवणकर यांच्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकामधून अजित पवार यांच्यावर हा आरोप करण्यात आला आहे. यावर माजी विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी खुलासा केलाय. मी माजी विभागीय आयुक्त असताना शासनाला प्रस्ताव दिला होता. हे सर्व प्रकरण गृह खात्याशी निगडित होते.त्यावेळेस गृहमंत्री आर आर पाटील होते. त्यांनी याला मान्यता दिली होती. सत्यपाल सिंह त्यावेळेस पोलीस आयुक्त होते. बदली झाल्यानंतर मीरा बोरवणकर आयुक्त म्हणून रुजू झाल्या.पण, त्यांनी हा प्रस्ताव नाकारला. त्यावेळेस काम झालं असतं तर पोलिसांना घर मिळाली असती. अजूनही पोलिसांना घरे मिळाली नाहीत. गृहमंत्री आर आर पाटील आणि गृह विभाग यांच्याशी सर्व प्रकरण निगडित आहे. पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी यासंदर्भात बैठक घेतली होती. पण, पुण्यातील त्या जागेचा आणि अजित पवार यांचा काही संबंध नाही, असे सांगत दिलीप बंड यांनी अजित पवार यांना क्लीन चीट दिलीय.
=== गणेश मारुती जोशी ( स्थानिक प्रतिनिधी )