हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – यंदाचा गळीत हंगाम सुरु करण्याबाबत शासनाचा अधिकृत निर्णय अद्याप झालेला नाही. तरीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते यावर्षीच्या गळीत हंगामातील शुंभारभ सोलापूर जिल्ह्यात विठ्ठलराव शिंदे सहकारी कारखान्यात उद्या सोमवारी होत आहे. मंत्रीमंडळाची गळीत हंगामातील तारीख जाहीर होण्याआधीच पवार कसे हंगाम सुरु करू शकतात, अशी विचारणा राजू शेट्टी यांनी केली आहे. साखर हंगाम सुरु करण्याबाबत सर्वकाही निर्णय अजित पवार घेणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याला म्हणायचे काम करतील, असे दोन दिवसापूर्वी विधान केले होते. आता त्याची प्रचिती येत आहे, असा टोमणा शेट्टी लगावला आहे.
आक्रोश पदयात्रा उद्यापासून
ऊसाला दुसरा हप्ता ४०० रूपये देण्यासह अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने उद्या सोमवारपासून आक्रोश पदयात्रा सुरु आहे. ५२२ किलोमीटर हि यात्रा निघणार आहे. गेल्या हंगामातील ऊसाला दुसरा हप्ता प्रतिटन ४०० रूपये द्या, साखर कारखान्यांचे वजनकाटे ॲानलाईन करा आदी मागण्यासाठी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांवर संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी हे २२ दिवसाची पदयात्रा काढणार आहेत. सोमवारी सकाळी दत्त कारखाना, शिरोळ येथून ही पदयात्रा सुरू होणार आहे, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी दिली.
=== गणेश मारुती जोशी ( स्थानिक प्रतिनिधी )