हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – मंदीराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत देवीला सांष्टांग दंडवत घालून मंदीरातील देवीच्या दागिन्याची चोरी करुन पसार झालेल्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.त्याच्या ताब्यातून चोरलेले दागिणे हस्तगत करण्यात आले आहे. ऐन नवरात्र उत्सवात देविचे दागिने परत मिळाले. त्याने दागिने स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नदीपात्रात लपवले होते.सुनिल आण्णा कांबळे (36, धंदा मंडप बांधणे, रा. रामनगर, बापुजी बुवा चौक, वारजे) असे मंदिरात चोरी करणाऱ्या आरोपी चे नाव आहे. त्याच्यावर तब्बल 50 पेक्षा अधिक घर फोडी व चोरीचे तसेच दोन खूनाचे गुन्हे दाखल असून सदर गुन्हयामध्ये सन 2018 पासून कारागृहामध्ये होता. दरम्यान मार्च 2023 मध्ये जामीनावर बाहेर आला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हददीत भिलारेवाडीत कात्रज घाटातील वळणाजवळ चामुंडाभवानी माता मंदीर असून मंदीरामध्ये 23 ऑगस्ट रोजी 2 लाख 60 हजार रुपये किमंतीच्या देवीच्या दागिन्याची चोरी झाली होती.याप्रकरणी मंदिराजे पुजारी रोशन ऋषीराज दाहाल (रा. भिलारेवाडी, कात्रज) यांनी दिलेल्या फिर्यादवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयाच्या तपास करत असताना पथकाने मंदीरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. आरोपी घटनेच्या दिवशी, तोंडाला कपडा गुंडाळून मंदीराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करताना दिसला.
यानंतर देवीला सांष्टांग दंडवत घालून मंदीरातील देवीच्या दागिन्याची चोरी केली. दरम्यान शोध पथकातील महेश बारावकर, निलेश ढमढेरे, चेतन गोरे यांनी आरोपीच्या मंदीरातील हालचाली व इतर माहितीच्या आधारे माग काढला. त्याने हा गुन्हा त्याचा साथीदाराचे मदतीने केला असल्याचे निष्पन्न झाले असून आरोपीकडून देवीचे चोरीस गेलेले एक चांदीचा कासव, चांदीच्या पादुका, चांदीची घंटी एक, चांदीची चामुंडा माताची मोठी व लहान टाग, चांदीचे नारळाचे तोरण, पिवळया धातुचे दागिने, पांढ-या धातुची कुत्रिम छत्री असे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.ही कारवाई उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहायक निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक धीरज गुप्ता, अंमलदार शैलंद्र साठे, चेतन गोरे, महेश बारावकर, मंगेश पवार, निलेश खैरमाडे, अवघून जमदाडे, निलेश ढमढेरे, सचिन सरपाळे, आशिष गायकवाड, राहूल तांबे, हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, मितेश चोरमोले, अभि चौधरी, अभि जाधव, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली.
== गणेश मारुती जोशी (हिंदजागर न्यूज,पुणे )