हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – गुन्हेगार मित्राच्या जामिनासाठी ठाणे येथून अट्टल सोनसाखळी चोरटयास बोलावून पुण्यात विश्रांतवाडी , येरवडा , भारती विद्यापीठ आणि कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरी झाल्याच्या प्रकरणातील मुख्य सुत्रधारास भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.त्याच्याकडून पाच गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून पोलिसांनी 1 लाख 15 हजार रूपये किंमतीचे दागिने जप्त केल्याची माहिती पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
तसेच या प्रकरणा एक जण अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.सागर संदीप शर्मा (20, रा. एसआरए बिल्डींग, बिबवेवाडी रोड, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचा ठाण्यातील साथीदार प्रथमेश उर्फ पिल्या प्रकाश ठमके Prathamesh (25, रा. पाससेवाडी गणपती मंदिराजवळ, कोपरी, ठाणे)
वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड (भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन ) यांच्या मार्गदर्शन खाली त्याच्या कडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्हेगार मित्राच्या जामिनासाठी ठाण्यातून साथीदार पिल्या ठमके याला पुण्यात बोलावून विविध ठिकाणी सोनसाखळी चोर्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून 5 गुन्हे उघडकीस आणले आहेत.12 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजता कात्रज लेक येथे मॉर्निंग वॉक करण्यासाठी गेलेल्या महिलेकडील सोनसाखळी चोरी झाल्याबाबत भा. विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी परिसरातील 22 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यावेळी आरोपी सागर संदीप शर्मा असल्याचे निष्पन्न झाले. तो दि. 17 ऑक्टोबर रोजी दांडिया खेळण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिस अंमलदार मितेश चोरमले, अभि चौधरी, अवधूत जमदाडे यांना मिळाली होती.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ, पीएसआय धीरज गुप्ता ,अंमलदार शैलेंद्र साठे, चेतन गोरे, महेश बारावकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, अवधूत जमदाडे, निलेश ढमढेरे,सचिन सरपाळे, अशिष गायकवाड, राहुल तांबे, हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, मितेश चोरमले, अभि चौधरी, अभि जाधव,विक्रम सावंत यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.
== गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज, पुणे )