हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – सर्वप्रथम हिंदजागर न्यूज नि ही बातमी प्रसारित केल्यानंतर तसेच श्री. कृष्णा जाधव ( रा – वैदुवाडी ) यांनी आपला जीव धोक्यात टाकून सदर बस प्रवेश करून 60 ते 70 लोकांचा जीव वाचवल्याबद्दल संपूर्ण पुणे शहरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या प्रकरणाची दखल चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे यांनी गांभीर्याने घेतली आहे. सध्याच्या वेळेला चतुर्श्रुंगी देवीच्या मंदिरामध्ये लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात भाविकांच्या सुरक्षेची जबाबदारी ही या पोलीस स्टेशनच्या खांद्यावरती आहे तसेच अलीकडील तीन दिवस भारतीय संघ हा या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वास्तव्याला होता त्याची व त्यांच्या सुरक्षेची मोठी जबाबदारी ही या पोलीस स्टेशनच्या खांद्यावरती होती त्यामुळे सातत्याने दिवस-रात्रपाळी करत या पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी आपली भूमिका चोख निभावली आहे.
आजची घटना ही दुपारच्या वेळी ची होती जेडब्ल्यू मेरिएट हॉटेल, एसबी रोड, येथे दारू पिऊन P. M.P. L बस चालकाने 60 ते 70 लोकांचा जीव धोक्यात टाकून. P. M.P. L बस क्रएमएच-14-एचयू-5725 यावरील चालक नामे निलेश ज्ञानेश्वर सावंत वय 31 वर्षे, रा. अतुलनगर, वारजे माळवाडी, पुणे याने 10 ते 15 गाड्यांना उडवले हा प्रकार पाहून तेथे जमलेल्या जमावातील काही लोकांनी ड्रायव्हर यास मारहाण केलीसदर ठिकाणी वेळेचा विलंब न करता कंट्रोल करून कॉल मिळायला मिळाल्या चतुर्शिंगी पोलीस स्टेशनचे बीट मार्शल श्री लोखंडे व श्री.दहातोंडे यांनी सुद्धा आपली जबाबदारी ही चूक बजावली होती.
सदर प्रकरणाची गंभीर दखल घेतं भारतीय दंड संहिता १८६ ( ३०८) ( २७९) ( ४२७ ) व मोटरवाहन अधिनियम, १९८८ (१८४ ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील सर्व आयपीसी सेक्शन कमिटेड गुन्हे आहेत व सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल केला गेला आहे. चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे व याचा पुढील तपास A. P. I संतोष चंद्रकांत कोळी करत आहे.
== गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज, पुणे )