हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा चांगलीच रंगात आली आहे. या स्पर्धेत भारताने सर्व सामने जिंकून गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले आहे. भारताच्या यशामुळे क्रिकेटप्रेमींचे प्रत्येक सामन्यावर लक्ष आहे.पुणे शहरात क्रिकेटचा थरार भारत-बांगलादेश सामन्यानंतर अधिकच रंगला. पुण्यात हा सामना झाला होता. आता क्रिकेट प्रेमी प्रत्येक सामन्यावर लक्ष ठेऊन आहे. त्याचवेळी बुकींनी सट्टा बाजार जोरात सुरु केला आहे. त्यात कोट्यवधींची उलाढाल होत आहे. पुणे पिंपरी चिंचवड शहरात सुरु असलेला सट्टा बाजार पोलिसांनी उघड केला. यावेळी बुकीला अटक केली असून पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 40 लाखांची रोकड जप्त करण्यात आली. या छाप्यामध्ये बुकी दिनेश शर्मा याला पोलिसांनी अटक केली. दिनेश शर्मा यांच्या बेटिंगच्या घटनास्थळावर पोलिसांनी छापा टाकला. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये चाळीस लाखांची रक्कम दिसत आहे. तसेच दिनेश शर्मा पोलिसांसमोर गयावया करत असताना दिसत आहे.
पिंपरी कॅम्प आणि आसपासच्या परिसरात सट्टाचा बाजार अनेक स्पर्धेदरम्यान भरत असतो. क्रिकेट सामने, फुटबॉल, आयपीएल प्रिमीअर लीगमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल पिंपरी चिंचवडमधील सट्टा बाजारात होते. आता नुकताच झालेल्या इंग्लंड विरुद्ध साऊथ आफ्रिका दरम्यान झालेल्या क्रिकेट सामन्यावेळी कोट्यावधींचा सट्टा पिंपरीत सुरु होता. पोलिसांना यासंदर्भात माहिती मिळाली. त्यानंतर गुंडा स्कॉड पथकाने छापा टाकला.
ऑनलाइन जगात क्रिकेट लाईव्ह लाईन गुरू या अॅपवर अनेकांना मोठ्या रक्कमेच आमिष दाखवले जाते. इंग्लंड विरुद्ध साऊथ आफ्रिका या सामन्यात सट्टेबाजी या अॅपवर सुरु होती. त्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने काळेवाडी येथील एका घरावर छापा टाकला. त्यानंतर दिनेश शर्मा याने यापुढे सट्टा खेळणार नाही. माफ करा. असे म्हणत असल्याचे दिसत आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांनी त्याला अटक केली. घटनास्थळावरुन चाळीस लाख ऐंशी हजारांची रोकड जप्त केली आहे.सट्टा प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या काही दिवसांपासून सट्टेबाजारावर कारवाई होत आहे. परंतु काही दिवसांत पुन्हा नवीन टोळी निर्माण होते. त्यामुळे पोलिसांसमोर पुन्हा नवीन आव्हान निर्माण होत असते.
— गणेश मारुती जोशी ( हिंदीजागार,न्यूज,पुणे )