हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – एका खरेदी खताच्या दस्तामध्ये २४ कोटी ९० लाख १५ सहस्र ८०० रुपयांच्या मुद्रांक शुल्काची अल्प आकारणी केली. योग्य मुद्रांक शुल्क न आकारल्याने शासनाचा महसूल बुडाला.या कारणास्तव आकुर्डी येथील दुय्यम निबंधक कार्यालयाचे (हवेली क्र. २४) सहदुय्यम निबंधक एस्.पी. भातंबरेकर यांचे निलंबन करण्यात आले आहे. ही माहिती राज्यशासनाचे अवर सचिव प्रीतमकुमार जावळे यांनी दिली.पुणे शहराचे मुद्रांक जिल्हाधिकारी संतोष हिंगाणे यांनी या कार्यालयास भेट दिली. त्या वेळी हवेली क्र. २४ कार्यालयाची चालू वर्षातील सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीतील नोंदवण्यात आलेल्या दस्तांची स्वैरपद्धतीने (सर्वसाधारण) छाननी केली. या छाननीमध्ये मुद्रांक शुल्क अल्प आकारल्याचे लक्षात आले. त्यानंतर भातंबरेकर यांचे पुढील आदेश येईपर्यंत निलंबन करण्यात आले. या दरम्यान त्यांचे मुख्यालय मुद्रांक जिल्हाधिकारी, गडचिरोली रहाणार आहे. शासनाच्या पूर्वअनुमतीविना त्यांनी मुख्यालय सोडू नये, असेही आदेशामध्ये करण्यात आले आहेत.
— विनोद वाघमारे हिंद ( जागर न्यूज, P. C. M. C )