हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – जर आपण अपात्र झालो, तर भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवायची, असा प्लान शिंदे गटाच्या आमदार-खासदारांनी केल्याची माहिती आहे.आमदारांच्या अपात्रतेबाबत तातडीने सुनावणी वेळापत्रक सादर करा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहेत. त्यामुळे आमदार अपात्रतेच्या सुनावणीला वेग येण्याची शक्यता आहे.यावरुन शिंदे गटातील आमदार-खासदारांमध्ये धाकधूक वाढली आहे. जर आपण अपात्र झालो, तर भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवायची, असा प्लान शिंदे गटाच्या आमदार-खासदारांनी केल्याची माहिती आहे.सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर ओढलेले ताशेरे आणि निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात असलेली याचिका यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदार आणि खासदारांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे.