हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – :श्रृंगी देवीला तोरण अर्पण करण्यासाठी गेलेल्या तरुणाला जुन्या भांडणाचा राग मनात धरून 11 जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली.याबाबत अनिकेत अशिष ननावरे (वय-19 रा. सुरती मोहल्ला, खडकी) याने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिकेत चांदणे (वय-21) प्रज्योत उर्फ मोन्या उमाळे (वय-22), हर्षद चांदणे (वय-20), प्रतिक फाळके (वय-22), यश उर्फ मोन्या गोपनारायण (वय-20) आयुष उर्फ बंट्या लांडगे (वय-19), पापु उर्फ प्रणय गोगले (वय-19), ऋषी बिवाल उर्फ खोड (वय-19) यांच्यासह इतर तीन साथीदार (सर्व रा. महादेववाडी, खडकी बाजार, पुणे) यांच्यावर 307,323,141,143,144,147,148,149, सह महाराष्ट्र पोलीस कायदा, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.ही घटना रविवारी (दि.22) सेनापती बापट रोडवरील चतु:श्रृंगी देवीच्या मंदिराजवळ घडली.
चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिकेत ननावरे हा त्याचा मामा विजय तायडे तसेच वस्तीतील मुले चतु:श्रृंगी देवीला तोरण अर्पण करण्यासाठी गेले होते. तोरण अर्पण करुन घरी परतत असताना मंदिराच्या बाजूला त्याच्या वस्तीत राहणाऱ्या आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरुन अनिकेतला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर मोन्या उबाळे याने ‘तुझा मर्डर करतो’ असे म्हणून हातातील धारदार हत्याराने अनिकेतच्या डोक्यात वार केला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. यानंतर आरोपींनी हत्यारे हवेत फिरवून ‘कोण मध्ये पडला तर त्याला पणमारुन टाकेन’ अशी धमकी देऊन परिसरात दहशत निर्माण करुन निघून गेले.
चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये यापुढे अशा प्रकारचे दहशत निर्माण करायचा प्रयत्न जर यापुढे कोणी केला तर संबंधितांवरती त्वरित कारवाई केली जाणार आहे यापुढे कुठलाही रेकॉर्डवरचा गुन्हेगार असेल आणि त्याबाबत एकही तक्रार आली तर संबंधित व्यक्ती वरती त्वरित प्रतिबंधक कारवाई करून स्थानबद्ध केले जाईल असेही सांगायला श्री.बालाजी पांढरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चतुर्शिंगी पोलीस स्टेशन विसरले नाही त्यामुळे चतुर्शिंगी पोलीस स्टेशन आता ऍक्टिव्ह मोड वरती आले आहे यावरून दिसून येते
तसेच पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक चतुर्शिंगी पोलीस स्टेशन श्री.बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय गाडेकर करीत आहे.