हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणी आमदार रविंद्र धंगेकर यांनी बंडगार्डन पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये त्यांनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, कर्मचारी आणि वसुलीचे काम करणारा कर्मचारी ललित पाटीलच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे.तसेच बंडगार्डन पोलिसांना ललित पाटीलचे काळे धंदे माहित असून ते अंमली पदार्थ विक्रीस मदत करत होते, असे म्हटले आहे. त्यांच्या आरोपाने पोलीस दलात खळबळ माजली आहे.ललित पाटील पलयाण प्रकरणानंतर आमदार रवींद्र धंगेकर यांनी सर्व प्रथम यामध्ये एका मंत्र्याचा हात असल्याचा आरोप केला होता. यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी थेट दादा भुसे आणि शंभुराजे देसाई यांचे नाव घेत खळबळ उडवून दिली. तर दुसरीकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उध्दव ठाकरे यांच्यावर निशाना साधून ललित पाटील शिवसेनेचा जिल्हाध्यक्ष होता असे वक्तव्य केले.यानंतर रवींद्र धंगेकर यांनी आज पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा तपसावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्यांनी तपास समाधानकारक नसल्याचे सांगत लपवा छपवी चालली असल्याचे म्हटले आहे. तसेच ललित पाटील पळून जाण्याअगोदर तपास अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉलवर बोलला असल्याचेही सांगितले.
धंगेकर म्हणाले, ललित पाटील प्रकरणात ससूनच्या अधिष्ठात्यांना सहआरोपी केले नाही, त्यांचे निलंबनही केले गेले नाही तसेच त्यांच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्डही तपासले गेले नाही. यामुळे पोलिसांची भुमिका संशयास्पद आहे. गृहमंत्री आदल्या दिवशी सांगतात ललित पाटील सापडेल कोठे पळुन जातोय आणि दोनच दिवसात त्याला अटक होते. याचा अर्थ पोलिस त्याच्या संपर्कात होते आणि त्याची अटक खोटी दाखवली गेली आहे. याप्रकरणात पोलीस आणि मंत्र्यांचे हात ओले झाले आहेत. यामुळे त्याचे एन्काऊंटरही होण्याची शक्यता आहे.
== गणेश मारुती जोशी ( हिंदजागर,न्युज,पुणे )