हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – श्रीदेवी श्रीदेवी चतुर्शिंगीची सिमोल्लंघनाची पालखी दुपारी 5.30 वाजता मंदिरापासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापर्यंत काढण्यात येणार आहे हेलिकॉप्टरमधून देवीच्या पालखीवर पुष्पवृष्टी. बँड, ढोल, लेझीम, नगारा, चौघडा, भुत्ये, वाघ्या, मुरळीसह, देवीच्या सेवेकर्यांचा सहभाग असणार आहे.दोन किलो वजनाची सोन्याची तलवार मुख्य आकर्षण असणार आहे.विजयादशमी निमित्त आज देवीची दोन किलो वजनाची सोन्याची रत्नजडित तलवार मंदिरात ठेवण्यात येणार आहे. भाविकांसाठी हे खास आकर्षण ठरणार असल्याची माहिती अधक्ष नंदकुमार अनगळ आणि कार्यकारी विश्वस्त नरेंद्र अनगळ यांनी दिली.