हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – सिंहगड रोड येथील हिंगणे चौकात झालेल्या अपघातात तीन महिला, एक पुरूष आणि एका लहान मुलाला चार चाकी गाडीने उडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अपघातात पाच जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, विठ्ठलवाडीहून आनंदनगरकडे जाताना हिंगणे बस स्थानकाच्या जवळ एका क्रेटा गाडीवरील चालकाचे अचानक नियंत्रण सुटले आणि बस स्थानकाजवळ उभ्या असलेल्या तीन महिलांना उडवलं. तसेच ही गाडी पुढे उभ्या असलेली एक दुचाकी गाडीला धडकल्याने तेथे थांबली. मात्र, या रस्त्यावर उभ्या असलेल्या तीन महिलांसह एक लहान मुलगा आणि एक पुरुष जखमी झाला असल्याचे प्राथमिक माहिती आहे.