हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – कात्रज-कोंढवा रस्ता येथील गोकुळनगर येथे झोपड्यांना आज (बुधवारी) सकाळी दहाच्या आग लागली. सुदैवाने या आगीमध्ये कोणीही जखमी झाले नाही.घटनास्थळी चार अग्निशमन दलाची वहाने व तीन पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले होते.घटनास्थळी झोपड्यांना मोठ्या प्रमाणात आग लागली(Pune) असल्याचे निदर्शनास येताच जवानांनी चार ही बाजूने पाण्याचा मारा सुरू केला व आग इतरञ पसरु नये याची खबरदारी घेत सुमारे तीस मिनिटात आग आटोक्यात आणत धोका दुर केला.तसेच या आगीमधे एक गॅस सिलेंडर फुटला आणि इतर सहा सिलेंडर जवानांनी तातडीने बाहेर काढले. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. सदर ठिकाणी एकुण सहा झोपड्या आगीमध्ये पुर्ण जळाल्या. घरामध्ये असलेले सर्व गृहपयोगी साहित्य पुर्ण जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे.
अग्निशमन केंद्र येथील अग्निशमन वाहने व मुख्यालयातून वॉटर टँकर तसेच अग्निशमन अधिकारी समीर शेख, सचिन मांडवकर, सुनिल नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 20 ते 25 जवानांनी सहभाग घेतला.
- गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज,पुणे )