हिंदजागर न्यूज प्रतिनिधी, पुणे – आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी आता मतदारसंघ निहाय आढावा बैठका घेण्यास सुरूवात केली आहे. यातच पुणे लोकसभा निवडणुकीवर भाजप, काॅंग्रेससह आता मनसेने देखील लक्ष केंद्रीत केलं आहे.यासाठी मनसेने पुणे लोकसभेची जबाबदारी अमित ठाकरे यांच्याकडे सोपवली आहे. सद्यस्थितीला बघता पुण्याचे मनसेचे माजी नगरसेवक व माजी शहराध्यक्ष बसंत मोरे यांचे त्यांच्या डॅशिंग स्वभाव बघता नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी एक वेगळा आकर्षण तयार झाले आहे त्यामुळे समोर कोणी असो समोरच्या उमेदवाराची मात्र मोरेन मूळ गोची होणार हे मात्र नक्की.
- हिंदजागरच्या व्हाट्सअप ग्रुपला नवनवीन बातम्यांसाठी लगेच जॉईन व्हा खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून —- https://chat.whatsapp.com/JY4m8UxPgYA6BvpDyO8H0b
पुणे लोकसभेसाठी भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ तसेच माजी शहाराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तर काॅंग्रेसकडून विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांच्या नावाची तर मनसेकडून माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. यातच शहारात ठिकठिकाणी भावी खासदार म्हणून देखील पोस्टर झळकू लागले आहेत.
खासदार गिरीश बापट यांचं निधन झाल्यानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काही महिनेच शिल्लक राहिल्याने या जागेसाठीही पुढेच निवडणुक होण्याची शक्यता आहे. यातच मनसेकडून वसंत मोरे यांना उमेदवारी दिल्यास याचा मोठा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. कारण भाजपच्या अंतर्गत राजकारणामुळे कसब्याची जागा काॅंग्रेसच्या ताब्यात गेल्याने काॅंग्रेसला याठिकाणी मोठं बळ मिळालं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत या मतदारसंघात काॅंग्रेस बाजी मारणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
— गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज,,पुणे )