हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – वडिलांसोबत दुचाकीवरील जाणाऱ्या सराफ व्यावसायिकावर 3 गोळ्या झाडण्यात आल्या असून तो गंभीर जखमी झाला आहे.ओसवाल नामक सराफ व्यावसायिकावर हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडल्या व त्याच्याजवळील कोट्यावधीचे सोने लुटून नेले.वानवडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
हिंदजागरच्या व्हाट्सअप ग्रुपला नवनवीन बातम्यांसाठी लगेच जॉईन व्हा खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून —- https://chat.whatsapp.com/JY4m8UxPgYA6BvpDyO8H0b
शांत शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुण्यात कायदा-सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले की काय अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर पुण्यातील प्रसिद्ध सराफा व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आली आहे.वडिलांसोबत दुचाकीवरील जाणाऱ्या सराफ व्यावसायिकावर 3 गोळ्या झाडण्यात आल्या असून तो गंभीर जखमी झाला आहे. प्रतिक मदनलाल ओसवाल (वय 35) असे गोळीबारात गंभीर झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, प्रतिक ओसवाल आणि त्याचे वडील दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी क्रोम मॉल चौकापासू बी. टी. कवडे रोड कडे जाणाऱ्या रस्त्यावर बुधवारी रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी दुचाकीवरून आलेल्या 3 जणांनी प्रतिकवर 3 गोळ्या झाडल्या. यावेळी प्रतिकच्या तोंडावर आणि मांडीत गोळी लागली आहे. यामध्ये प्रतीक गंभीर जखमी झाला आहे. जखमी प्रतिकला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण आहे. या घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला आहे. दरम्यान हा गोळीबार नेमका कोणी आणि कोणत्या कारणारून करण्यात आला हे मात्र समजू शकलेले नाही. प्रतिक आणि त्याचे वडील सोने घेऊन निघाले होते. गोळीबार करणाऱ्यांनी ते सोने घेऊन गेल्याचे प्रथमदर्शी नागरिकांनी सांगितले.