हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – महाराष्ट्राचे कुलदैवत व बहुजन समाजाचा लोकदेव असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाचा पालखी सोहळा सोमवती यात्रेनिमित्त सोमवारी सकाळी कऱ्हा स्नानासाठी मार्गस्थ झाला.आज जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती यात्रा असून, यळकोट यळकोटचा गजर करत भंडाऱ्याची उधळण करत लाखो भाविक खंडेरायाच्या जेजुरीत.तर भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनही सज्ज झालं आहे. कऱ्हा नदीवर देवाचा पालखी सोहळा स्नानासाठी आल्यानंतर भाविकांसाठी पार्किंग सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच महाप्रसादाचे नियोजन देखील करण्यात आलं आहे. राज्यभरातून लाखो भाविकांनी जेजुरीगडावर खंडेरायाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे.
सकाळी सात वाजता देवाचे मानकरी असणाऱ्या पेशवे, खोमणे व माळवदकर यांनी सूचना करताच श्री खंडोबा देवाचा पालखी सोहळा काढण्यात आला. यावेळी देवसंस्थानच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देण्यात आली. मंदिर प्रदक्षिणानंतर श्री खंडोबा व म्हाळसा देवीची उत्सव मूर्ती पालखीत ठेवण्यात आली. पालखी सोहळा कऱ्हा स्नानासाठी गडावरून मार्गस्थ होताना हजारो भाविकांनी येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करीत खंडोबा देवाचे लेणे असणाऱ्या भंडाराची मुक्त उधळण केली. यावेळी संपूर्ण जेजुरी गड भंडाराने न्हावून निघाला. देवा तुझी सोन्याची जेजुरीचा प्रत्यय भाविकांनी यावेळी अनुभवला.पायरी मार्ग उतरून ऐतिहासिक छत्री मंदिर मार्गे पालखी सोहळा कऱ्हा नदीकडे मार्गस्थ झाला. या पालखी सोहळ्यात पालखी सोहळ्याचे खांदेकरी, मानकरी, पुजारी सेवक वर्ग, विश्वस्त, ग्रामस्थ व मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते.
या राज्यभरातून जेजुरी गडावर अनेक भाविकांनी मागणी केली आहे. सोयीसाठी व्यवस्थापित अनेक पर्याय त्यांच्यासाठी आहेत. काही जागा सोमवती यात्रेच्या भिंती एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. भाविकांची गैरसोय खांदेकरांना विशिष्ट ड्रॉकोड देण्यात आला आहे. तसेच, पालखी सोहळ्यातील भाविकांना चहा,पाणी व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती डॉ. राजेंद्र खेडेकर विश्वस्त, जेजुरी ट्रस्ट यांनी दिली.