हिंदजागर न्यूज प्रतिनिधी, पुणे – पुण्याच्या रिक्त जागेवरती अखेर शासनाने श्री प्रवीण पुरी, भाप्रसे यांची आयुक्त म्हणून नेमणूक केली आहे.
अपंग कल्याण आयुक्तालय स्थापन झाल्यापासून गेल्या अठरा वर्षांत केवळ दोन अधिकाऱ्यांनी आयुक्तपदाचा कार्यकाळ पूर्ण केला असून इतर दहा अधिका-यांनी सुमारे एक ते दीड वर्षातच बदली करून घेतली आहे. अपंग कल्याण आयुक्तालयाकडे अधिकाºयांकडून दुय्यम स्वरूपाचे काम म्हणून पाहिले जात असल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्यामुळे राज्यातील दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यास कोणीही वाली नाही, अशी भावना दिव्यांगांकडून व्यक्त केली जात आहे.राज्यात सुमारे २९ लाख दिव्यांग असून त्यांना आवश्यक सोईसुविधा उपलब्ध करून देणे, राज्य व केंद्र शासनाकडून दिव्यांगांसाठी राबविल्या जाणाºया योजनांची योग्य अंमलबजावणी करणे, तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, सरकारी कार्यालये आदी ठिकाणी दिव्यांगांचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडविणे आदी कामे अपंग कल्याण आयुक्त कार्यालयातर्फे करणे आवश्यक आहे. मात्र, अपंग कल्याण आयुक्त कार्यालय स्थापन झाल्यापासून केवळ दोन अधिकाºयांचा अपवाद वगळता बहुतांश अधिकाऱ्यांनी केवळ एक ते दीड वर्षच या पदावर काम केले आहे. तर काही अधिकाऱ्यांनी दोन ते आठ महिनेच आयुक्तपदी काम पाहिले आहे.दिव्यांग व्यक्तींच्या अडचणी सोडविण्यासाठी आयुक्तांनी व आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी काम करणे अपेक्षित आहे. मात्र, कार्यालयात अपुरे मनुष्यबळ आहे. आयुक्तांना न्यायालयाचा दर्जा असून त्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करणे सर्व संस्था व अधिकाऱ्यांना बंधनकारक आहे. मात्र, अनेक अधिकारी या पदावर काम करण्यास उदासीन असल्याचे दिसून येते.
— श्री.विनोद वाघमारे ( हिंदजागर न्यूज,पुणे )