हिंदजागर न्यूज प्रतिनिधी, पुणे – सहारा इंडिया समूहाचे प्रमुख सुब्रत रॉय यांचे मंगळवारी निधन झाले. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 75 वर्षांचे होते. मागील काही महिन्यांपासून ते आजारी होते.’सहारा’ प्रमुख सुब्रत रॉय दीर्घकाळापासून गंभीर आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी त्यांचे पार्थिव लखनौमधील सहारा शहरात आणले जाईल, जिथे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल. सुब्रत रॉय यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. भारतीय कॉर्पोरेट जगतात त्यांनी आपली वेगळी छाप सोडली होती.
सुब्रत रॉय यांचा जन्म बिहारमधील अररिया येथे एका उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. लहानपणी ते नेहमीच हुशार विद्यार्थी म्हणून गणले जात होते. त्यांनी गोरखपूरच्या शासकीय तांत्रिक संस्थेतून मेकॅनिकल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा केला. सहारा समूहाची स्थापना करण्यापूर्वी, त्यांना रिअल इस्टेट व्यवसायात 18 वर्षे काम केले. त्याशिवाय, बिझनेस डेव्हलपमेंटचा 32 वर्षांचा अनुभव होता. त्यांनी स्वप्ना रॉयशी लग्न केले आहे. त्यांना 2 मुले आहेत, सुशांतो रॉय जे कंपनीचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. सीमंतो रॉय हे कंपनीचे कार्यकारी संचालक आहेत.सुब्रत रॉय सहारा यांचा जन्म 10 जून 1948 रोजी झाला. ते भारतातील आघाडीचे व्यापारी आणि सहारा इंडिया परिवाराचे संस्थापक होते. त्यांना देशभरात ‘सहरश्री’ म्हणूनही ओळखले जात होते.
— श्री. गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज, पुणे )