हिंदजागर न्युज प्रतिनिधी, पुणे – तळवडे येथील फटाक्यांच्या (फायर क्रॅकर) अनधिकृत कारखान्यात शुक्रवारी दुपारी स्फोट झाला आणि होत्याचे नव्हते झाले. या स्फोटाने कारखान्याच्या भिंती हादरल्या आणि महिला मजूर होरपळल्या.इतरांच्या वाढदिवसाचे ‘सेलिब्रेशन’ व्हावे म्हणून केकसाठी शोभेचा फटाका तयार करणाऱ्या सहा महिलांचा अक्षरश: कोळसा झाला.
दररोज सकाळी नऊला कारखान्यात काम सुरू व्हायचे. मजूर महिला दुपारच्या जेवणाचे डबे घेऊन येत. शुक्रवारी दुपारी मजूर महिलांनी एकत्र येत गप्पा मारत जेवण केले. त्यानंतर त्यांनी सर्वांचे रिकामे डबे एकाच ठिकाणी ठेवले. जेवण उरकून लगेचच पुन्हा फटाक्यांचे काम सुरू केले. मात्र, त्यानंतर दुर्घटना घडली आणि एकत्र जेवतानाचा आनंदाचा क्षण अखेरचा ठरला. ते डबे काळेठिक्कर पडले होते.जीव वाचविण्याची धडपड आणि चपलांचा खचस्फोटानंतर जखमी महिला कारखान्यातून बाहेर पडण्यासाठी जिवाचा आकांत करीत होत्या. मात्र, केवळ एकच दरवाजा आणि तोही अर्धवट उघडा असल्याने बाहेर पडण्यात अडचणी आल्या. सर्वत्र धूर झाल्याने आणि श्वास घेण्यास प्रचंड त्रास होत असतानाही जखमी महिला दरवाजाजवळ धडपडत आल्या. तेथे त्यांच्या चपलांचा खच पडला होता.
कारखान्याला आणखी दरवाजे असते तर कदाचित मजूर महिलांना लवकर बाहेर पडता आले असते. धूर शेडबाहेर पडून श्वास घेण्यास त्रास झाला नसता. मात्र, एकच दरवाजा आणि एकच खिडकी असल्याने धूर आणि मजूर कारखान्यातच अडकले.बाहेर पडता आले असते तर..