हिंदजागर न्युज प्रतिनिधी, पुणे – करोनाच्या नव्या व्हेरिएंटने आरोग्य व्यवस्थेची डोकेदुखी वाढवली आहे. रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असताना आता महाराष्ट्रातही नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळत आहेत. सिंधुदुर्गानंतर आता पुण्यातही जेएन १ सब व्हिरिएंटचे रुग्ण आढळले आहेत.यामुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे. पुण्यात कोरोनाचे दोन रुग्ण आढल्याचे सांगितले जात आहे.राज्यात आज (रविवार) ९ रुग्णांची नोंद झाली आहे.
त्यातील ठाणे महापालिका हद्दीत ५, पुणे शहरात २, पुणे जिव्हा व अकोला शहरात १-१ रुग्णाची नोंद झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येला नियंत्रित करण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष टास्क फोर्सची स्थापना केली आहे.कोरोनाचा नवीन उपप्रकार जेएन. १ ने बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. दररोज शेकडो नवीन रुग्णांची भर पडत हे. गेल्या २४ तासांत देशात कोविड-१९ संक्रमित ६५६ नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या देशात ३,७४२ सक्रीय कोरोनाबाधित रुग्ण असून यापैकी सर्वाधिक १२८ रुग्ण केरळमध्ये आहेत.दरम्यानमहाराष्ट्राचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.त्यांनी स्वतःसोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.
—- विनोद वाघमारे ( हिंदजागर न्यूज, पुणे )