हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी,पुणे – अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘एफटीआयआय’च्या विद्यार्थी संघटनेतर्फे ‘रिमेंबर बाबरी डेथ ऑफ कॉन्स्टिट्यूशन’ अशा आशयाचे बॅनर इन्स्टिट्यूटच्या आवारात झळकविण्यात आले होते.
आज संध्याकाळी ५ वाजता जनवाडी येथून श्री.निलेश प्रकाश निकम यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) परिसरात वादग्रस्त बॅनर झळकली त्याबाबतची निषेधार्थ रॅली काढली आहे त्यामध्ये अनेक हिंदुत्ववादी संघटनेने त्यांना पाठिंबा दिला आहे तसेच मोठ्या संख्येने तरुण उपस्थित राहणार आहे. नुसते गुन्हे दाखल करून काही उपयोग नाही १५ जणांविरोधात गुन्हे दाखल केले पण त्यांना अटक कधी होणार ????? त्यांनी याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री तसेच पुण्याचे पोलीस आयुक्त यांना पत्राद्वारे कळवले आहे. मी व माझे सर्व सहकारी संविधानाला मानणारे आहोत, आम्हाला कायदा संस्था कुठेही बिघडायची नाही पण अशाप्रकारे जर काही गोष्टी होत असेल तर आम्ही शांतही बसणार नाही वारंवार असे अनेक ठिकाणी प्रकार घडत आहेत व पोलीस प्रशासन नेहमी आमच्यावरतीच दबावा टाकत आहे आम्हाला आमच्या सणांना सुद्धा खूप अटी शर्ती घालून परवानगी दिल्या जातात व त्यामध्येही आमच्यावरती दबाव असतो, आम्हाला कुठल्या जाती विषयी तेढ निर्माण करायचा नाही पण आम्हाला आमच्या हक्काचं पण सोडायचे नाही तरी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आजच्या या रॅलीला आम्हाला आपण सहकार्य करावे व कुठलाही प्रकारचा दबाव आणू नये ही विनंती असे श्री.निकम यांनी आपले म्हणणे मांडले.
या वादग्रस्त बॅनरमुळे मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास हिंदुत्ववादी संघटनांच्या काही कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत ‘एफटीआयआय’च्या आवारात प्रवेश केला. त्यानंतर आवारातील बॅनर या कार्यकर्त्यांनी जाळले. ‘एफटीआयआय’ विद्यार्थी संघटनेने याबाबत निवेदन प्रसिद्ध करत आपली बाजू स्पष्ट केली. ‘एफटीआयआय’च्या आवारात आलेल्या जमावाने सुरक्षा रक्षकांना दाद दिली नाही. काही विद्यार्थ्यांनी चौकशी केली असता जमावाने त्यांना शिवीगाळ केली. विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मंकम नोकव्होम यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांना या जमावाने मारहाण केली. या वेळी सुरक्षा रक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतली होती. या गंभीर हल्ल्याचा निषेध आम्ही करतो’, असे या निवेदनात म्हटले आहे.
— गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज, पुणे )