हिंदजागर न्यूज,प्रतिनिधी पुणे – शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील आशानगर येथे महापालिकेच्या माध्यमातून पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनी टाकीचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दुपारी एक वाजता होणार आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उद्घाटन करण्याच्या आधीच काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर व श्री.दत्ता बहिरट ( मा.नगरसेवक पुणे महानगरपालिका ) यांनी या वादळग्रस्त टाकीचा नारळ फोडून शुभारंभ केलेला आहे .
स्थानिक आमदार सिध्दार्थ शिरोळे व माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांच्यामध्ये टाकीच्या उद्घाटनासाठी लढाई सुरू.. टाकीचे उदघाटन दुपारी एक वाजता पवार यांच्या हस्ते होण्याअगोदरच कॉग्रेसचे दत्ता बहिरट, मोहन जोशी, रमेश बागवे, अविनाश बागवे, विरेंद्र किराड, रविंद्र धंगेकर,अभय छाजेड, गजानन थरकुडे, उद्या महाले, आदी कार्यकर्त्यांनी सकाळी साडेदहा वाजता उदघाटन करण्याचा घाट घातला आहे.संपूर्ण परिसराला छावणीचा स्वरूप आले आहे पोलीस पदाची आरोपचे जवान जागेवरती तैनात झाले आहेत . पोलिसांनी काँग्रेसचे अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. संपूर्ण पुणे शहरातून या भागामध्ये पोलीस बंदोबस्त मागवला आहे.
— गणेश मारुती जोशी ( हिंदजागर,न्यूज पुणे )