हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी,पुणे – आशानगर येथील पाण्याच्या टाकीच्या उद्घाटन प्रसंगी महापालिका अधिकाऱ्याला अर्वाच्या भाषेत शिवीगाळ करणे आमदार रवींद्र धंगेकर यांना चांगलेच महागात पडले आहे. महापालिकेच्या अभियंता संघाच्या निषेधानंतर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा आमदार धंगेकर व इतर कार्यकर्त्यांवर चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला.
कुठवर सहन करणार राजकारण्यांची गुंडागर्दी – निव्वळ निषेध व्यक्त करून संपेल का त्यांची दंडेलशाही ? असे प्रश्न उपस्थित करत आज पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी भर गर्दीत,भर दिवसा सर्वांसमक्ष पाणीपुरवठा प्रमुख नंदकिशोर जगताप यांना झालेल्या अर्वाच्य शिवीगाळ आणि दमदाटी विरोधात निषेध सभा घेतली आशानगर येथील पाण्याच्या टाकीच्या उद्घाटन प्रसंगी काँग्रेस आमदर रविंद्र धंगेकर यांनी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.पोलिसास मारहाण केल्याप्रकरणी भाजप आमदार सुनील कांबळे यांच्याविरुद्ध काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. त्यापाठोपाठ आता आमदार धंगेकर यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल झाला आहे ?? चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर या पुढील काळात या प्रकरणाबाबत अनेक राजकीय दबाव येण्याची शक्यता न करता येत नाही !!!!
गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज, पुणे )