हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी पुणे – लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी लवकरच सुरु होणार आहे. यासाठी सर्व राजकीय पक्ष, नेते आणि कार्यकर्ते यांनी पक्ष बांधणीला सुरवात केली आहे.सर्वच पक्षात लोकसभेच्या उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे.तसेच चित्र पुण्यातही बघायला मिळत आहे.
तसे पाहायला गेले तर साईनाथ बाबर हे गेल्या दहा वर्षापासून राजकारणामध्ये सक्रिय आहेत परंतु ते पुण्याला फारसे माहित झाले ते 2017 नंतर ना जेव्हा वसंत मोरे हे तिसऱ्यांदा नगरसेवक झाले आणि वसंत मोरे म्हटलं वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करणारा कार्यकर्ता अशी त्यांची सभागृहात ओळख आहे आक्रमक पणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बाजू गेली पंधरा वर्षे सातत्याने पुणे महानगरपालिकेच्या सभागृहात ते मांडतात त्यांनी केलेल्या अनेक आंदोलनावर पुणे महानगरपालिकेचे सभागृह चार चार तास चालते वसंत मोरे आणि साईनाथ बाबर हे दोनच नगरसेवक 2017 ते 2022 या पाच वर्षात नगरसेवक होते त्यावेळी वसंत मोरे यांनी केलेल्या प्रत्येक आंदोलनास सोशल मीडियामध्ये प्रचंड प्रसिद्धी मिळाली तेव्हापासून साईनाथ बाबर ही प्रकाश झोतात आले तसं पाहिलं तर वसंत मोरे 2009 ला हडपसर विधानसभा लढले तेव्हा साईनाथ बाबर कोंढवा परिसरात शिवसेनेचे शाखाप्रमुख होते परंतु काही अंतर्गत वादामुळे त्यांनी शिवसेना आणि महादेव बाबर यांना रामराम ठोकळा हीच योग्य संधी पाहून 2009 च्या विधानसभेत पराभूत झालेल्या वसंत मोरे यांनी साईनाथ बाबर यांना ताकद देऊन महादेव बाबर यांना कोंडव्यातच रोखण्याचा यशस्वी प्रयत्न केला त्यामुळे 2012 ला साईनाथ बाबर यांच्या पत्नी सौ आरती बाबर या नगरसेविका झाल्या आणि तेव्हापासून साईनाथ बाबर प्रकाश झोतात आले 2017 ला पुणे मनपाच्या निवडणुकीत साईनाथ बाबर यांच्या विरोधातील शिवसेनेच्या उमेदवाराचा फॉर्म बाद झाला आणि याच संधीचा साईनाथ बाबर यांनी फायदा घेतला व ते नगरसेवक झाले कोविड काळात साईनाथ बाबर यांनी सुद्धा वसंत मोरे यांच्याप्रमाणेच चांगली कामगिरी केली त्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले 2021 ला वसंत मोरे यांना राज ठाकरे यांनी पुणे शहराध्यक्ष म्हणून नेमणूक केली त्याचवेळी वसंत मोरे यांनी त्यांच्या मनाचे मोठेपण दाखवले आणि साईनाथ बाबर यांना गटनेते पद देऊन टाकले त्यानंतर कालांतराने मशिदी वरील भोंग्यांचा प्रश्न बाहेर आला आणि वसंत मोरे यांना राज ठाकरे यांच्या आदेशानंतर पुणे शहराध्यक्ष पद सोडावे लागले त्याचवेळी इतर कोणीही शहराध्यक्ष पद घेऊ शकत नव्हते याचवेळी राज ठाकरे यांनी साईनाथ बाबर यांचे नाव जाहीर करून टाकले आणि इथेच खरी वादाची ठिणगी पडली ती आजपर्यंत सातत्याने चालूच आहे कदाचित येणाऱ्या लोकसभेपूर्वी या ठिणगीचा भडकाही होऊ शकतो…
मनसे कडून पुण्यात साईनाथ बाबर आणि वसंत मोरे दोघेही लोकसभेच्या उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शर्मिला ठाकरे यांनी साईनाथ बाबर यांना पुणे लोकसभा खासदारकीचे संकेत दिले आहे पण पुण्यामध्येच सध्या चर्चेत असलेले वसंत मोरे यांची टॅगलाईन ” पुण्याची पसंत मोरे वसंत ” ला लोकांनी पसंती दिली आहे. वास्तविक पाहता वसंत मोरे यांनीच साईनाथ बाबर यांना मनसेमध्ये आणले, श्री.बाबर यांना योग्य मार्गदर्शन देऊन सर्व काम मार्गी लावणारे हेच ते वसंत मोरे.
— गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज, पुणे )