हिंदजागर न्यूज,प्रतिनिधी,पुणे – पुण्याचे नवीन पोलिस आयुक्त अमितेश कुमारांनी नामचीन गुंडांचा दरबार भरवून त्यांना हिशेबात राहण्याचा दमच दिला. अमितेश कुमारांच्या खाक्याने दहशतीचे साम्राज्य वाढविणाऱ्या टोळ्यांचे म्होरके वठणीवर येण्याची आशा असतानाच पर्वतीतील गुंडाने चक्क एका कुटुंबाच्या प्लॅटवर ताबा ठोकला आहे.त्याने केवळ ताबाच नाही; तर चक्क घरात घुसून या गुंडाने आपला संसारही थाटल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली; तरीही पोलिसांनाही न जुमणाऱ्या या गुंडाने मूळ घरमालकाला जिवे मारण्याची धमकी दिल्याचे पुढे आले आहे.
निकेतन निंबाळकर ( पी.एस.आय, सध्या कार्यरत सिंहगड पोलीस स्टेशन ) यांच्यावर या आदीसुद्धा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये फिर्यादी महिले वरती तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप निकेतन निंबाळकर ( पी.एस.आय,) यांच्यावर झाला होता त्यावेळी सुद्धा वरिष्ठांनी त्यांना पाठीशी घातले !!!! तसेच सध्या निकेतन निंबाळकर ( पी.एस.आय ) एका खाजगी विकासाला भागीदार आहेत व तो खाजगी विकासात अनेक लोकांना फसवत आहेत त्यावरती ज्यांची फसवणूक झाली ते गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता श्री.निंबाळकर तकडदारांवरती दबाव आणून तुम्ही ते आपापसात मितवा पोलीस स्टेशनला येऊ नका असे राज रोज कोणी सांगत आहेत . तसेच सदर खाजगी विकासात हे यांच्याच म्हणजेच की श्री.निंबाळकर यांच्या सल्ल्यानुसार वागत आहेत यावर पुणे चे नवीन पोलीस आयुक्त यांच्याकडे सुद्धा लेखी तक्रार श्री. निलेश निकम यांनी केली आहे व या प्रकरणाबाबत अनेक लोकांना फसवले गेले आहे व पोलीस यंत्रणा कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे त्यामुळे राज्याचे गृह विभागाचे अवर सचिव यांची भेट भेट घेऊन पुराव्या सहित कागदपत्रे देणार आहेत व लवकरात लवकर यात जे कोणी देशी अधिकारी आहेत व त्यांना मदत करत आहेत त्यांच्यावरती कारवाईची मागणी करणार आहे.
माजी नगरसेवकाच्या नातेवाइकानेच धाक दाखवून फ्लॅट बळकाविण्याचे उद्योग केल्याचे सांगण्यात येत आहे. गुन्हेगारी मोडीत काढून पुणेकरांना विश्वास देण्याचा प्रयत्न अमितेश कुमार करीत असतानाच ही घटना पुढे आली आहे. त्यामुळे घर मिळविण्यासाठी पोलिस आयुक्तालयापासून पोलिस ठाणे, चौकीत चकरा मारणाऱ्या या कुटुंबाला अमितेश कुमार हे न्याय देणार का, याकडे लक्ष आहे.कर्ज काढून घेतलेला प्लॅट मिळविण्यासाठी धडपडणाऱ्या लाडवा कुटुंबीयांनाच ‘मॅनेज’ करून तो विकण्यासाठी दबावही अन्य गुंडांकडून आणला जात आहे. त्यावरूनही लाडवा हे कुटुंबीय अडचणीत आले आहेत. मात्र, काही केल्या फ्लॅट सोडणार नसल्याचे सांगून संबंधित कुटुंबीय पोलिसांकडे धाव घेत आहे, पण राजकीय दबावामुळे पोलिसांची कारवाई पुढे सरकली नसल्याचेही दिसत आहे. त्यामुळे पोलिस कमिशनर अमितेश कुमार हे काही ठोस पावले उचलणार का, हे पाहावे लागणार आहे.हा वाद स्वारगेट पोलिसांपर्यंत गेला. तिथे तत्कालीन पोलिस निरीक्षकांना गुंडाला बोलावून फ्लॅटचे कुलमुखत्यार पत्र रद्द करण्यास सांगितले. त्यानंतर फ्लॅटही मालकाच्या ताब्यात देण्यास सांगितले. त्याला होकार देत ८ दिवसांत फ्लॅट मोकळा करणार असल्याचे सांगितले. मात्र, राजकीय नेत्यांची मदत घेऊन फ्लॅट सोडण्यास नकार दिला. त्यानंतर कुटुंबीय पोलिस ठाण्यात फेऱ्या मारल्या. त्यात काही अधिकाऱ्यांनी फ्लॅट मिळवून देण्याच्या दृष्टीने हालचाली केल्या; मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे ते शक्य होत नसल्याने पोलिस कारवाईही थांबल्याचे स्पष्ट आहे.
गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी पुणे )