हिंदजागर प्रतिनिधी, पुणे – पत्रकारांवरती होणाऱ्या वारंवार हल्ल्या बाबत पुण्यातील संविधान ग्रुप चांगलेच आक्रमक झाले ते दिसून येत आहे. सचिन गुलाब गजरमल ( संविधान ग्रुपचे राष्ट्रीय,अध्यक्ष ) यांच्या नेतृत्वाखाली थेट पुण्याचे जिल्हाधिकारी गाठून थेट धरणे आंदोलन करण्यात आले . त्यावेळेस श्री.राकेश सोनवण ( संविधान ग्रुपचे संस्थापक / अध्यक्ष ), श्री.सागर अडागळे ( पुणे शहराध्यक्ष ) स्वातीताई गायकवाड ( महाराष्ट्र प्रदेश, अध्यक्ष ) अर्चनाताई केदारी ( महाराष्ट्र प्रदेश,उपाध्यक्ष ), छायाताई कांबळे ( महाराष्ट्र प्रदेश,कार्याध्यक्ष ) यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते .
वारंवार पत्रकारांवरती होणाऱ्या हल्ल्याबाबत संविधान ग्रुपचे शिस्त मंडळ लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची भेट घेऊन याविषयी कायदा तयार करून पत्रकारांना संरक्षण देण्याबाबतचा प्रस्ताव तयार करावा याबाबत विनंती करून हा विषय विधिमंडळात लवकरात लवकर मान्य करण्याची विनंती करणार आहे व त्याबाबतचा सातत्याने पाठपुरावा करणार आहे . तसेच पुण्याचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री नामदार अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी श्री सचिन गुलाब गजरमल ( राष्ट्रीय अध्यक्ष,सविधान ग्रुप,) यांनी केली आहे.
पत्रकारांवर हल्ले करून त्यांना दाबण्याचा मूर्खपणा कुणीही करू नये. त्यामुळे खोटे लपणार नाही. सत्य हे केव्हा तरी बाहेर येणारच आहे. याचे भान ठेवावे, असे मत श्री. सचिन गुलाब गजमल ( राष्ट्रीय अध्यक्ष, संविधान ग्रुप ) . तुम्ही धमक्या दिल्या, रस्ता अडवला, गाड्या फोडल्या तरीसुद्धा सभा झालीच. पण याद राखा इथून पुढे एकाही पत्रकाराच्या केसाला धक्का लागला तर संविधान ग्रुपचे सदस्य घरात घुसून मारतील असा इशारा संविधान ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी दिला आहे . तसेच त्यांनी त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार श्री.निखिल वागळे यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरती सुद्धा निषेध व्यक्त करायला विसरले नाही .
गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज, पुणे )