हिंदजागरण न्यूज प्रतिनिधी,पुणे – एकीकडे पुण्यामध्ये निकेतन निंबाळकर ( पी.एस.आय, सध्या कार्यरत सिंहगड पोलीस स्टेशन ) हे त्यांच्या व्यवसायिक मैत्री जपत तक्रारदाराला तक्रार न करता पोलीस स्टेशनच्या बाहेर सेटलमेंट करण्यासाठी सांगणाऱ्या व या अगोदर सुद्धा महिला फिर्यादीला आपापसात बसून मिटवून टाका असा सल्ला देणारे श्री.निंबाळकर यांच्यावरती कारवाई करण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त हे जरी वेळ लावत असले तरी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांनी मात्र धडक कारवाई करत आय.पी.सी 363, 384, 385, 120(ब), 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. गांजाच्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी देऊन देहुरोड पोलिसांनी कॉलेज तरुणाकडे 20 लाखांची मागणी करुन जबरदस्तीने पाच लाख रुपये खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.अनिल चौधरी, अमन शेख, हुसेन डांगे, मोहम्मद अहमेर मिर्झा असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर शंकर गोरडे, मुन्नास्वामी, देहुरोड पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक हेमंत गायकवाड, पोलीस शिपाई सचिन शेजाळ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत वैभवसिंग मनिषकुमार सिंग चौहाण (वय-19 रा. बॉईज हॉस्टेल सिम्बायोसिस कॉलेज किवळे) याने देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.
मा.देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याकडे राज्याची मोठी जबाबदारी व महाराष्ट्राचे गृह विभागाची जबाबदारी असताना सुद्धा तसेच पुणे पोलीस आयुक्तांनी पदभर स्वीकारल्यापासून गुंडगिरी वर आवळ घालण्यासाठी शहरातील सर्व नामचीन गुन्हेगारांची परेड काढली होती !!! मग त्यांच्याच पुणे आयुक्तालयाच्या वर्दी मधील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवरती लगाम व कारवाई कधी होणार ??? निकेतन निंबाळकर ( पी.एस.आय, सध्या कार्यरत सिंहगड पोलीस स्टेशन ) हे राज रोज पुणे त्यांच्या व्यवसायिक भागीदारा बरोबर पोलीस चौकीमध्ये बसून त्यांचं वैयक्तिक काम साधत आहेत व तक्रारदारांना धमक होत आहेत त्यांच्यावर ती कारवाई लवकरात लवकर करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते श्री.निलेश प्रकाश निकम यांनी केली आहे …
हा प्रकार उघडकीस आल्याने पिंपरी चिंचवड पोलीस दलात खळबळ उडाली आहे. हा प्रकार 10 फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वाबारा ते 11 फेब्रुवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान सिम्बायोसिस कॉलेज जवळील सेवन कॅफे, मायाज लॉज येथे तसेच गहुंजे स्टेयीयम येथे घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी चौहान हा तरुण किवळे येथील सिम्बायोसिस कॉलेज कॉलेजमध्ये शिकतो.तो कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहतो. देहुरोड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अंमलदार आणि इतर आरोपींनी संगनमत करुन चौहान याच्याकडून पैसे उकळण्याचा कट रचला. त्यानुसार 10 फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास कॉलेज जवळील सेवन कॅफे मधून अपहरण केले.तेथून चौहान याला मायाज लॉज, गहुंजे स्टेडियम आणि तिथून देहुरोड पोलीस ठाण्यात आणले. चौहान याला गांजाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये घालण्याची धमकी दिली. कारवाई टाळायची असेल तर 20 लाख रुपयांची मागणी केली. पोलिसांसह इतर आरोपींनी धमकी दिल्याने घाबरलेल्या चौहान याने त्याच्या बँक खात्यातून वेगवेगळ्या बँक खात्यावर गुगल पे व नेट बँकींगद्वारे 4 लाख 98 रुपये देण्यास भाग पाडल्याचे फिर्यादीत नमूद केले.पुढील तपास देहूरोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मुगुट पाटील हे करीत आहेत.
गणेश मारुती जोशी ( हिंदजागर प्रतिनिधी, पुणे )