हिंदजागर न्यूज प्रतिनिधी,पुणे – प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून बालाजी पांढरे यांची ओळख आहे . मागील १ वर्षांपासून चतुर्शिंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले अतिशय उत्कृष्ट पद्धतीने व सामान्य जनतेच्या हिताची त्यांनी त्यांच्या कार्यकाळात काम केले . गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अनेक वेगवेगळी पद्धतीने परिसरामध्ये उपाय योजना राबवल्या .पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शनिवारी चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांची बदली करून अजय कुलकर्णी यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक चतुर्शिंगी पोलीस स्टेशन यांची वर्णी लावली आहे तसेच बालाजी पांढरे यांना युनिट – 3 ची जबाबदारी सोपवली आहे.