हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी, पुणे – इलेक्शन कमिशन मधील बदल्यांमध्ये चतुर्शिंगी पोलीस स्टेशनचे बालाजी पांढरे यांची काल बदली झाल्यानंतर त्यांनी चतुर्शिंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाचा आज पदावर सोडला अतिशय भावनिक वातावरणामध्ये पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना निरोप देण्याचा कार्यक्रम क्वचितच पहायला मिळाला, निरोप देत असतांना अनेकांना अश्रु अनावर झाले होते. . छत्रपती शिवाजीनगर भागातील व चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रकार घडला.गेली एक वर्षे बालाजी पांढरे यांनी चतुर्शिंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यभार सांभाळला. सर्वसामान्यांशी संपर्क वाढवत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले. सगळ्याचा प्रेमाचा स्वीकार करत बालाजी पांढरे यांनीही कुणाची गळाभेट घेत तर कुणाशी हातमिळवत प्रत्येकाचे आभार मानले. यावेळी सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरिक भावूक झाले होते. अतिशय शिस्तप्रिय व संपूर्ण पुणे शहर गाजवलेले अधिकाऱ्यांमध्ये यांचे नाव घेतले जाते गुन्हेगारांमध्ये मोठ्या प्रमाणात यांच्या नावाची दहशत आहे. चतुर्शिंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी असताना त्यांच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हेगारांवरती चांगला वचक निर्माण केला होता त्यांच्या काळामध्ये त्यांनी ५ मोका आणि ६ एम.पी.डी.ए तसेच त्यांच्या हद्दीतील १५ ते २० गुन्हेगारांना तडीपार केले . राजभवन त्यांच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असल्याकारणाने भारताचे प्रधानमंत्री , केंद्रीय गृहमंत्री ,केंद्रीय संरक्षण मंत्री , मुख्यमंत्री असे अनेक पोलीस बंदोबस्त हे हद्दीत शांतता राखून पार पाडले .
पुणे शहर गुना शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी श्री पांढरे हे विराजमान होते त्यांच्या कालखंडामध्ये त्यांनी १०० हून अधिक आर्मी अॅक्ट केसेस तसेच ५० हुन अधिक खंडणी व सावकारीच्या केसेस दाखल करून पुणे शहरातील संपूर्ण सावकारी खाजगी सावकारी उध्वस्त करण्याचा मोठा वाटा व यश त्यांना मिळाले होते . खुक्यात गुंड गजानन मारणे यांनी जेलमधून सुटल्यानंतर रॅली काढून पोलिसांची प्रतिमा याला डाग लावायचा प्रयत्न केला असता त्यावेळी गजानन मारणे च्या आयुष्यात पहिल्यांदा अटक करण्यात आली म्हणजे श्री.पांढरे नुसते अटक करून ते शांत बसले नाही तर त्याच्यावरती व त्याच्या साथीदारांवरती मोका अंतर्गत कारवाई करून श्री.पांढरे स्वस्त बसले. पुण्याच्या अनेक नामचीन गुन्हेगारांची धरपकड करत त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करून गुन्हेगारीला आळा घालण्याचा प्रयत्न केला व कमी काळामध्ये त्यांना व त्यांच्या प्रयत्नांना यश सुद्धा आले. त्यांच्या या अशा धाडसी व रोखठोक स स्वभावामुळे भा मुळे त्यावेळेस चे पुणे शहराचे तत्कालीन पोलीस आयुक्त श्री.अमिताभ गुप्ता साहेब यांनी चतुर्शिंगी पोलीस स्टेशन हळदी मधील वाढती गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या अगोदरच चतुर्शिंगी पोलीस स्टेशनची हद्द येथे कायदा सुव्यवस्था याचा समतोल राखण्यासाठी यांची नियुक्ती केली . लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील ४४ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या . श्री.पांढरे यांची पुणे शहर युनिट- ३ येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक येथे बदली झाली आहे व त्या ठिकाणाचा चार्ज आज ते घेणार आहेत .