हिंदजागर न्यूजे प्रतिनिधी, पुणे – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून वसंत (तात्या) मोरे इच्छुक उमेदवार आहेत तशी त्यांनी अनेक वेळा प्रसारमाध्यमांसमोर त्यांची भूमिका मांडलेली आहे त्यासाठी त्यांनी संपूर्ण पुणे शहरातील 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये जोरदार मोर्चे बांधणी केली आहे तशाप्रकारे त्यांनी संपूर्णपणे शहरात जोरदार कार्यक्रमही चालू केले आहेत त्यामुळे दिवसेंदिवस पुणे शहरातील छोट्या छोट्या वस्त्यांमध्ये वसंत मोरे यांच्या नावाचा मोठ्या प्रमाणात बोलबाला होत आहे कोरोना कालावधीनंतर वसंत मोरे यांनी त्यांच्या कामाची दिशा पूर्णपणे बदललेली दिसत आहे यामध्ये विशेषता रुग्णांना मदत फायनान्स कंपन्यांकडून होणाऱ्या जाचातून गोरगरीब रिक्षावाले व इतरांना मदत दवाखान्यांच्या बिलामध्ये मदत बिल्डरांकडून होणाऱ्या फसवणुकीमध्ये मदत करणे यांसारख्या प्रश्नांना हात घालून वसंत मोरे खऱ्या अर्थाने पुणे की पसंत मोरे वसंत झाल्याचे दिसत आहे वसंत मोरे हे मनसेचे तीन वेळा निवडून येणारे महाराष्ट्रातील एकमेव लोकप्रतिनिधी आहेत.
पुणे शहरात पहिल्यांदा जनता दरबार चालू करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वसंत मोरे एकमेव नेते आहेत. तसेच फेसबुक लाईव्ह द्वारे जनतेला न्याय मिळवून देऊन सामान्य जनतेमध्ये मोरेंची वेगळीच जादू व किमया आहे. पुणे शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हटले की वसंत ( तात्या) मोरे हे नाव पहिल्यांदा लोकांच्या डोळ्यासमोर येते. सध्या संपूर्ण पुणे शहरात त्यांची एक टॅग लाईन खूप प्रसिद्ध आहे ” पुण्याची पसंद… मोरे वसंत.. ” याच लोकप्रियतेच्या जोरावरती जनता ही वसंत ( तात्या) मोरे यांना पुणेकरांचा प्रतिनिधित्व करण्यासाठी दिल्लीला पाठवू शकते याची प्रचिती सामान्य लोकांना आली असली तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वरिष्ठ नेत्यांना अजून तरी आलेली दिसत नाही ??? सध्या पुणे शहरात वसंत (तात्या ) मोरे यांच्या अनेक क्लिप्स वायरल होत आहेत त्यातील एक क्लिप खूप जास्त प्रमाणात वायरल झाली आहे. हे मात्र खरं आहे लोकसभा निवडणुकीसाठी मनसेचे वसंत मोरे ठरणार ” जाईन्ट किलर “
राज साहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राला दाखवलेली ब्लू प्रिंट ही खऱ्या अर्थाने वसंत मोरे यांनी त्यांच्या प्रभागात विकासाच्या माध्यमातून उमटवलेली दिसून येते अगदी सुरुवातीच्या काळापासून वसंत मोरे हे राज ठाकरे यांचे पुण्यातील कट्टर समर्थक मानले जातात त्यामुळे ते महाराष्ट्रातील मनसेचे महानगरपालिकांमध्ये पहिले विरोधी पक्षनेते ही झाले सातत्याने सहा वर्ष पुणे शहराचे मनसेचे सभागृहातील गटनेते सुद्धा होते त्यानंतर ते पुणे शहराचे मनसेचे शहराध्यक्ष सुद्धा झाले त्यांच्या शहराध्यक्ष पदाच्या कालावधीत त्यांनी संपूर्ण पुणे शहरात जवळजवळ 150 शाखाध्यक्ष नेमून पुणे शहरातील मनसेचे सर्व मतदार संघामधील वर्चस्वहि दाखवून दिले होते त्यांच्या शहराध्यक्ष पदाच्या कालावधीत मनसेमध्ये आलेली मरगळ झटकण्याची कामही वसंत मोरे यांनी केले त्यांच्या शहराध्यक्ष पदाच्या कालावधी मध्ये शहरांमध्ये नव्याने पक्ष बांधणी झाली होती शहरासह सभागृहामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे त्याचा फायदा आगामी लोकसभा निवडणुकीत वसंत मोरे यांना 100% होऊ शकतो मनसेसह वसंत मोरे यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात पुणे शहरातील तरुणांमध्ये चाहता वर्ग आहे अनेक कार्यक्रमांमध्ये त्याचा प्रत्यय येतो त्यांची सर्व सामान्य माणसांमध्ये असणारी प्रतिमा हीच त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांना खटकते त्यामुळे वसंत मोरे यांना विरोध करण्यासाठी उमेदवारी मध्ये नसणारी स्पर्धा दाखवली जात आहे अशी ही कुजबुज सर्वसामान्य पुणेकरांसहा त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते करताना दिसतात सोशल मीडियाच्या माध्यमातून वसंत मोरे यांचा फॅन फॉलोवर्स फक्त पुण्यापुरता मर्यादित नाही तर तो संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेला दिसतो अशावेळी वसंत मोरे यांची ताकद त्यांच्या पक्षातील नेत्यांसह इतरांनी वाढवली तर वसंत मोरे हे लोकसभेचे प्रबळ दावेदार म्हणून पुढे येऊ शकतात आणि पुणे शहरात ते भविष्यात एक वेगळा निर्णयही देऊ शकतात वसंत मोरे हे मनसेचे पहिले खासदार होऊ शकतात …