हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी, पुणे – पूर्वी मनसेमध्ये असलेले वसंत मोरे हे वैशिष्ट्यपूर्ण आंदोलनांमुळे सातत्याने चर्चेत असायचे. आता वसंत मोरे यांनी मनसेला रामराम करून वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला असला तरी त्यांची नागरिक प्रश्न सोडवण्याचे हटके स्टाईल कायम आहे.सध्या कात्रज परिसरामध्ये वसंत मोरे यांचे लावण्यात आलेले पोस्टर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.पुण्यातील कात्रज कोंढवा रस्ता हा मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावरती सातत्याने अपघात होत असून अनेकांना यामुळे आपले प्राण गमावावे लागत आहेत. नुकत्याच एका तरुणीला अपघातात आपले प्राण गमवावे लागले.
मागील आठवड्यात देखील अशाच प्रकारच्या अपघातामध्ये एका तरुणाला देखील आपले प्राण गमवावे लागले होते. अपघाताचे हे सत्र गेल्या काही वर्षापासून सातत्याने सुरू असताना प्रशासनाकडून मात्र तात्पुरत्या उपाययोजना करण्यात येत आहे.भूसंपादपणा अभावी रखडलेल्या या कात्रज कोंढवा रस्त्याचं काम तातडीने मार्गी लावण्या संदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल असलं तरी प्रत्यक्षात मात्र या रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही.त्यामुळे प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात वसंत मोरे पुन्हा एकदा आक्रमक झाले असून त्यांनी या परिसरात पोस्टर लावून महापालिका प्रशासन आणि भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांना सवाल केला आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना देखील मोरे यांनी विचारणा केली आहे.
कात्रज कोंढवा रस्त्यावरती लावण्यात आलेल्या पोस्टरमध्ये ट्राफिक वॉर्डन हरवले आहेत असं ठळकपणे लिहिलं आहे. तसेच कात्रज चौक ते खडी मशीन कोंढवा चौक या रस्त्यावर वारंवार अपघात होऊन निष्पाप नागरिकांचे जीव जात आहेत.म्हणून पुणे मनपाच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात 50 ट्राफिक वॉर्डन नेमले आहेत परंतू, आम्ही पाहणी केली असता आम्हाला ते आढळून येते नाहीत.आपणांस सापडल्यास कृपया आम्हालाही कळवा. असं या पोस्टरवर म्हंटलं आहे.यावर वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट देखील केली आहे. या पोस्ट मध्ये मोरे म्हणतात, बहुचर्चित कात्रज कोंढवा रोडवरील कात्रज चौक ते कोंढवा खडी मशीन चौक या रस्त्यावर गेल्या वर्षभरापासून उपाय केले जात आहेत.
आदरणीय आमदार आणि त्यावेळचे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत व्हावी, नागरिकांना प्राण गमवावे लागू नये म्हणून हा 50 वॉर्डनचा प्रकल्प पहिल्यांदाच राबवण्यात आला. त्यामध्ये पद्धतशीरपणे कसा घोटाळा केला आणि लोकप्रतिनिधींना प्रशासन ठेकेदार कसे वेड्यात काढतात याचे पुरावे येत्या दोन दिवसात देणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.
Repoter – विनोद वाघमारे.