हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी- पुणे – मागील महिन्यात पुणे शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मॉडेल कॉलनी येथील परिमल गार्डन या ठिकाणी नाल्याचे सांडपाणी साचून परिमल गार्डन भागात घाण जमा झाली होती.यामुळे स्थानिक नागरिकांना आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज परिमल गार्डन या ठिकाणी भेट दिली.या भेटीमध्ये शिरोळे यांनी तेथील परिस्थितीचा आढावा घेतला असताना हे उद्यान सांडपाणी साचल्याने बंद असल्याचे नागरिकांना त्याचा वापर करता येत नसल्याचे निदर्शनास आले. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी तातडीने महापालिकेच्या ड्रेनेज विभाग, गार्डन विभाग आणि रस्ता विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत उद्यान तात्काळ स्वच्छ करण्याच्या सूचना दिल्या. येथे फुटलेली ड्रेनेज लाईन देखील पुढील आठ दिवसात दुरुस्त करण्यात येईल, याबरोबरच गार्डन परिसर स्वच्छ करण्यात येईल असे आश्वासन शिरोळे यांनी नागरीकांना दिले. यावेळी रवींद्र साळेगांवकर, शैलेश बडदे, अपूर्वा खाडे, अपर्णा कुराडे, रविराज यादव आणि सुनीता सुधीर, सागर मदाने, मुजाहिद हुसैन आदी उपस्थित होते.
याशिवाय शेजारील चाणक्य सहकारी गृहरचना संस्था मर्या या ठिकाणी देखील शिरोळे यांनी भेट दिली. येथे नागरिकांच्या कचरा व स्वच्छता विषयक प्रश्न जाणून घेत त्या पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिल्या.
आज परिमल गार्डन येथे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या भेटीवेळी या भागातील महिलांनी शिरोळे यांना ओवाळीत तीन फूट मोठी राखी बांधत ते करीत असलेल्या कामाबद्दल त्यांचे आभार मानले.
— पी संभाजी सूर्यवंशी .