हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. नेते मंडळींकडून बैठका, मेळावे त्याचसोबत नागरिकांसोबतच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत.पुण्यामध्ये नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला. या मेळाव्याकडे दोन्ही आमदारांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. आमदार चेतन तुपे आणि आमदार सुनील टिंगरे यांनी या मेळाव्याला दांडी मारली. या मेळाव्यात अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राज्याचे मुख्यमंत्री करण्यासाठी त्यांचे हात बळकट करण्यासाठी अपेक्षा व्यक्त करण्यात आले असतानाच अजित पवार गटाच्या शहरातील दोन्ही आमदारांनी मेळाव्याकडे पाठ फिरवल्याने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये चांगली चर्चा रंगली. हे दोघेही मेळाव्यामध्ये न दिसल्यामुळे पुण्यात आता जोरदार चर्चा सुरू आहे.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या शहराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सेंट्रल पार्क येथे मेळावा झाला. या मेळाव्यास राष्ट्रवादी व्यापार या सेलचे प्रदेशाध्यक्ष, शहर कार्याध्यक्ष, माजी महापौर, माजी नगरसेवक उपस्थित होते. भविष्यात अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजे. तसेच राज्यपालनीत सदस्य आणि दीपक मानकर यांना विधान परिषदे पाठवावे असे दोन ठराव मंजूर करण्यात आले. दोघेही आमदार मेळाव्याला उपस्थितीत नसल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळाव्याला उपस्थित न राहिल्याबद्दल सुनील टिंगरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘माझी तब्येत ठीक नसल्याने मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मेळाव्याला उपस्थित राहू शकलो नाही. काळजी करू नका मी अजितदादांसोबत आहे आणि अजितदादांसोबतच राहणार आहे.’, असे स्पष्टीकरण वडगाव शेरीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी दिलं आहे.
Repoter – गणेश मारुती जोशी.