हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये दिनांक २८/०९/२०२४ रोजी १९/३० वाजे चे सुमारास सुस-पाषाण टेकडी पुणे येथे स्पायसर कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे नागालैंड राज्यातील फिर्यादी नामे पॉजेंदाई कामेई वय १९ वर्ष धंदा शिक्षण रा.श्री भास्कर मधुकांत कोल्हे यांचे घरी भाडेकरु, प्लॉट नं २०, फ्लॅट नं १०५, दुसरा मजला, आनंद नगर, स्वीमींग पुल रोड, जे मार्ट चे मागे, गंगानगर जुनी सांगवी पुणे. मुळपत्ता-राज्य. नागालैंड, व त्यांचा मित्र नामे राकेश रॉय असे मिळुन सदर ठिकाणी सायकलींग ट्रॅकींगकामी गेले असता सदर ठिकाणी ०४ अनोळखी इसमांनी येवुन फिर्यादी यांना त्यांचा मित्र यांना कोयत्याचा धाक दाखवुन व कोयत्याने मारहाण करुन त्यांचेकडुन दोन मोबाईल फोन व इतर साहित्य असा एकुण-२०,०००/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने काढुन घेवून चोरी करुन नेला आहे. म्हणुन फिर्यादी यांनी ०४ अनोळखी इसमाविरुध्द दिले तक्रारीवरुन चतुः श्रृंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर, गु.र.नं. ७७७/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३११,३५१ (३), ३५२, ३(५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम-३७ (१) (३), सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
दाखल गुन्हयाचे घटनास्थळी मा. वरिष्ठांनी भेट देवून दाखल गुन्हयाबाबत सुचना दिल्याने सदर गुन्हयाचा पुढील तपास हा वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी व अंमलदार करीत असताना तपास पथकातील अधिकारी/अंमलदार यांनी यातील आरोपीची गोपनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त करुन यातील आरोपी नामे १) अजिंक्य अशोक बोबडे, वय-१८ वर्ष,रा-गुरुकृपा बिल्डींग, दुसरा मजला, रुम नं.०३, संत तुकाराम नगर वाघजाई चौकाजवळ, नवी सांगवी पुणे. २) निखील बाबासाहेब डोंगरे, वय-१८ वर्ष, रा-साकेत सोसायटी, आंबेडकर चौक, डी.पी. रोड औंध पुणे.व ०२ विधीसंघर्षात बालक यांचा हददीत/परहददीत शोध घेवुन घेवुन त्यांना शिताफीतीने ताब्यात घेवुन त्यांना दाखल गुन्हयात अटक करुन त्यांचेकडुन दाखल गुन्हयात जबरदस्तीने काढुन चोरुन नेलेला व गुन्हा करताना वापरलेली मोटार सायकल व लोखंडी धातुचा कोयता असा एकुण – ०१,२१,२००/-रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करुन उत्तम कामगिरी केली आहे.
तसेच सदरची कामगिरी ही मा. सहायक पोलीस आयुक्त सोो. खडकी विभाग, पुणे शहर श्री. अनुजा देशमाने, यांचे मार्गदर्शनाखाली चतुः श्रृंगी पोलीस स्टेशन पुणे शहर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन पुणे शहर महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजयानंद पाटील तपास पथकाचे अधिकारी, सहायक पोलीस निरीक्षक/नरेंद्र पाटील, पोलीस उप-निरीक्षक, प्रणिल चौगले, पोलीस हवालदार/ श्रीकांत वाघवले, पोलीस हवालदार/बाबुलाल तांदळे, पोलीस हवालदार/ सुधाकर माने, पोलीस हवालदार/इरफान मोमीन, पोलीस हवालदार/बाबासाहेब दांगडे, पोलीस हवालदार/श्रीधर शिर्के, पोलीस हवालदार/ किशारे दुशिंग, पोलीस हवालदार/संदिप दुर्गे, पोलीस हवालदार/विशाल शिर्के, पोलीस अंमलदार बाबासाहेब भांगले, पोलीस अंमलदार/प्रदिप खरात, पोलीस अंमलदार/श्रीकांत साबळे, पोलीस अंमलदार/प्रशांत गायकवाड यांनी केली आहे.
— गणेश मारुती जोशी .