हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – मुंबई – सलमान खान होस्ट करत असलेला बिग बॉस 18 नुकताच सुरू झाला आहे. शो सुरू होताच बिग बॉसच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. या विकेंडला सलमान खान बिग बॉस18 होस्ट करणार नाही. बिग बॉसमध्ये सलमान खान दिसणार नाहीये. सलमान खानने बिग बॉस18 शुटींग कॅन्सल केलं आहे. माजी नेते बाबा सिद्धिकी यांची 12ऑक्टोबरच्या रात्री वांद्रे येथे हत्या करण्यात आली.बाबा सिद्धिकी आणि सलमान खान यांचे फार जवळचे संबंध होते. बाबा सिद्धिकी यांच्या हत्येनंतर सलमान खानने बिग बॉसचं शुटींग कॅन्सल केलं आहे.सलमान खान आणि बाबा सिद्धिकी हे अनेक वर्षांपासून एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. बाबा सिद्धिकींच्या इफ्तार पार्टीला सलमान खान गेला नाही असं कधी झालं नाही. त्यांच्या मैत्री सर्वश्रृत आहे. सलमान खान आणि शाहरुख यांच्यातील शीतयुद्ध बाबा सिद्धिकी यांनीच त्यांच्या इफ्तार पार्टीमध्ये मिटवलं होतं.
सलमान खानने बिग बॉस 18चं शुटींग कॅन्सल केलं आहे. मुंबई पोलिसांनी त्याला बाबा सिद्धिकीच्या कुटुंबाला भेटण्यास नकार दिला आहे त्याचप्रमाणे रुग्णालयात जाण्यापासूनही थांबवलं आहे. बाबा सिद्धिकी यांच्या हत्येमागे लॉरेंन्स बिश्नोई गँगचा हात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सलमान खानच्या घरावरही लाँरेन्स बिश्नोईने गोळीबार केला होता. सलमान खानच्या सेफ्टीसाठी त्याला कोणतंही शुट न करता घरी राहण्याचा सल्ला दिला.
या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात असल्याचा संशय पोलिसांना होता. आता बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारली असून सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट केली आहे.यात त्यांनी बाबा सिद्धीकी यांच्या हत्येचं कारण देखील सांगितलं आहे. तसेच या हत्येला बॉलिवूड अभिनेता सलमान खानला जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. बिश्नोई गँगने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, “ओम जय श्री राम, जय भारत मला जीवनाचे सार समजते. मी शरीर आणि पैसा याला धूळ मानतो. तेच सत्कर्म केले गेले, तेच मैत्रीचे कर्तव्य होते. सलमान खान, आम्हाला हे युद्ध नको होते पण तू आमच्या भावाचे नुकसान केले”.
“जर कोणी आमच्या भावाला मारले तर आम्ही नक्कीच प्रतित्युत्तर देऊ. जय श्री राम जय भारत”, असं बिश्नोई गँगने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली. आहे तर आणखी एकाचा शोध घेण्यासाठी तपास पथके रवाना झाली आहेत. या हत्या प्रकरणात खळबळजनक खुलासे होत असून २ लाखांची सुपारी घेऊन ही भयंकर हत्या करण्यात आल्याचे आता समोर आले आहे.
— अनुराग भालचंद्र साळुंखे .