हिंदजागर जागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने काल मंगळवार (दि.१५) सागर बालवडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चांदणी चौक येथील चांदणी लॉन्स येथे युवा संवाद व स्नेह भोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मोठ्या संख्यने नागरिक उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सर्व युवकांशी संवाद साधत भाजप नेते अमोल बालवडकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच कोथरूड विधानसभा मतदारसंघातील युवकांच्या कुठल्याही अडचणी असतील तर त्या सोडविण्यासाठी सदैव आपल्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
निवडणुका येतील आणि जातील पण आपले जिव्हाळ्याचे संबंध असेच टिकवून ठेऊया, जेणेकरून प्रत्येकाच्या अडचणीत सहभागी होऊन एकजुटीचे परिस्थितीचा सामना करता येईल, असे मतही त्यांनी या कार्यक्रमात मांडले.
“आपल्या देशाच्या आणि परिसराच्या विकासात युवक महत्वाची भूमिका बजावत असतो. त्यामुळे युवकांची मोलाची साथ मिळाली तर कुठलेही कार्य असो, ते पूर्णत्वास आणणे सहज शक्य होईल. परिसरातील गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच प्रत्येक युवकाला रोजगार मिळावा या उद्देशाने सोबतीने काम करूया आणि शाश्वत विकासाकडे सर्वांनी वाटचाल करूया”, असे आवाहन भाजप नेते अमोल बालवडकर यांनी उपस्थितांना केले.
— गणेश मारुती जोशी.