हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून भारतीय जनता पक्ष चांगलाच सक्रिय झाला आहे. पक्षच प्रमुख नेते राज्यभरात कार्यकर्त्यांशी संवाद साधत विधासभेच्या कमला लागले आहे.यातच पुणे भाजपात कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची लाट आल्याचं बोललं जात आहे. यातच आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पुण्यात होते. त्यांनी भाजपातील नाराजांची शाळा घेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी पक्षाने दिलेल्या उमेदवाराचे काम करण्याची दिली तंबी नेते आणि कार्यकर्त्यांना दिली. यातच उमेदवार यादी घोषित करण्यापूर्वी हालचालींना वेग आला आहे.
बावनकुळे यांनी आज विद्यमान आमदारांना आव्हान देणाऱ्या इच्छुकांची भेट घेतली आहे. दिलीप वेडे पाटील, प्रसन्न जगताप, अॅड. मधुकर मुसळे यांच्याशी त्यांनी संवाद साधला. कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर, खडकवासलासह कसब्यात नवीन कार्यकर्त्याला संधी देण्याची इच्छुकांची मागणी आहे.
या बैठकीला अमोल बालवडकर आणि श्रीनाथ भिमाले गैरहजर होते. आज भिमाले यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण लढणारच असल्याचा निर्धार केल्याने विद्यमान आमदार माधुरी मिसाळ या तातडीने बावनकुळे यांच्या भेटीला पोहोचले होते. मात्र या भेटीनंतर मी आता रिलॅक्स असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. कोथरूड, खडकवासला, वडगाव शेरी, कसबा, पुणे कॉन्टोन्मेंट, शिवाजीनगर या मतदारसंघात भाजपात नाराजीची लाट असल्याचं सूत्रांचा म्हणणं आहे.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उमेदवारी घोषित होईपर्यंत स्पर्धा असते. त्यानंतर स्पर्धा संपते. सर्वच इच्छुकांना उमेदवारी देता येत नाही. पुण्यातील सगळ्याच इच्छुकांसोबात चहा घेणार असल्याचं ते म्हणाले होते.
— गणेश मारुती जोशी