HindJagar News – पुणे – GBS या आजारामुळे पुणेकरांची चिंता वाढलीये. जीबीएस रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आज एकाच पुण्यात दिवसात जीबीएसचे 10 रुग्ण वाढ झालीये. सध्या राज्यात एकूण जीबीएस रुग्णांची संख्या 158 वर पोहोचलीये.यातील 21 रुग्ण सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. पुण्यात आतापर्यंत 5 रुग्णांचा GBS मुळे मृत्यू झालाय. तर सोलापूरातही एकाने जीव गमावलाय.
पुण्यात आतापर्यं एकूण 158 संशयित रुग्ण सापडले आहेत. तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे.आतापर्यंत 127 रुग्णांची GBS अहवाल आले आहेत. यापैकी 31 रुग्ण पुणे मनपा, 83 रुग्ण हे नव्याने पुणे मनपा अंतर्गत समाविष्ट केलेल्या गावामधील आहे. 18 रुग्ण प्रिपरी चिंचवड मनपा व 18 रुग्ण पुणे ग्रामीण आणि 8 रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. यापैकी आतापर्यत 38 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले. 48 रुग्ण आयसीयुमध्ये आणि 21 रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत.
टँकरद्वारे दुषीत पाणीपुरवठा
किरकिटवाडी, नांदेड सिटी, धायरी या तिन्ही गावांना पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या टँकर पॉईंटची तपासणी करण्यात आली होती. याच परिसरात जीबीएसचे सर्वाधिक रुग्ण आढळल्याने या पाण्याची तपासणी करण्यात आली होती. या तपासणीचा धक्कादायक रिपोर्ट न्यूज18 च्या हाती आला आहे. रोज 200 पेक्षा जास्त टँकर या 15 पॉईंट्वरून भरले जातात. महापालिकेच्या टँकरने पाणीपुरवठा करणाऱ्या सगळ्या टँकरच्या पाण्यात ई कोलाय आणि कॉलीफॉर्मचे विषाणू आढळून आले आहेत. 15 टँकर भरण्याच्या सगळ्या पॉईंट्वरून टँकरने होणारा सगळा पाणी पुरवठा दुषित असल्याचं या अहवालातून समोर आलं आहे.
इम्युनोग्लोब्यूलिन’ हे इंजेक्शन महापालिका मोफत उपलब्ध करणार
14 जानेवारीनंतर खासगी हॉस्पिटलात दाखल झालेल्या झालेल्या जीबीएस रूग्णांना मिळणार 1 लाखांची मदत मिळणार आहे. शहरी गरीब योजनेची मर्यादाही जीबीएस रूग्णांसाठी 2 लाखांपर्यंत वाढवली आहे, अशी माहिती पुणे महापालिकेकडून देण्यात आली आहे. कमला नेहरु रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी ‘इम्युनोग्लोब्यूलिन’ हे इंजेक्शन महापालिका मोफत उपलब्ध करून देणार आहे.
न्यूस रिपोटेड – P. S . Survanshi.