हिंदजागर प्रतिनिधी – बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा देताना राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्याबाबत मोठं विधान केलंय अजित पवार यांच्यासह काही आमदार फुटणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. यावरून मंत्री दादा भुसे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना दादा भुसे यांनी अजित पवार हे अनेक वर्षांपासून अस्वस्थ असल्याचं आपल्याला माहिती आहे असं म्हटलं. दादा भुसे म्हणाले की, अजित पवार यांच्याबाबत मला माहिती नाही.
वरिष्ठ पातळीवर या गोष्टी सुरू आहेत. अजित दादा अस्वस्थ आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून दादा अस्वस्थ असल्याचं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे काहीही होऊ शकतं.
इंदू मिलबाबत बोलताना दादा भुसेंनी म्हटलं की, बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक व्हावं अशी सगळ्यांचीच मागणी आहे. मागच्या काळात ते काम सुरूही झालं. मुख्यमंत्री शिंदे यांनी या कामाची पाहणी केली आहे.मला वाटतं की ते काम लवकरच पूर्ण होईल. ठाकरे गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मातोश्रीवर रडल्याचा दावा केला होता. याबद्दल विचारले असता दादा भुसेंनी सांगितलं की, हा एक केविलवाणा प्रयत्न आहे. बालिशपणा आहे अस मला वाटतं त्यांनी त्याच वेळी बोलायला हवं होतं. ही राहुल गाधी स्टाईल असून बाहेर जाऊन देशाची बदनामी करत आहेत. ठाकरे गटावर टीका करताना दादा भुसेंनी म्हटलं की, मविआच्या संगतीचा हा परिणाम आहे. विकासकामे होत आहेत त्यामुळे यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. विकासावर बोलायला तयार नाहीत. शिवसेना हा पक्ष असा आहे जो तळागाळात जाऊन काम करतोय.
- श्री.प्रदीप कांबळे ( स्थानिक प्रतिनिधी )